Serious Kidney Diseases: किडनीसाठी ठरू शकतील 'हे' आजार सायलेंट किलर; वेळीच व्हा सावध

या गंभीर आजारामुळे तुमचं जीवन धोक्यात येऊ शकतं,वेळीच सावध व्हा
Serious Kidney Diseases
Serious Kidney Diseasesesakal

Silent killer Kidney Disease: आरोग्याकडे दूर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवतात. किडनी हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. शरीरातील घाण बाहेर काढणे हे किडनीचं महत्वाचं कार्य आहे. मात्र याच किडनीचे आजर उद्भवल्यास ते जीवासाठी धोकादायक ठरू शकतात. किडनीच्या आजाराला सायलेंट किलर असेही म्हणतात. या आजारांचे सुरूवाती लक्षणे दिसत नसल्यामुळे तुम्हाला काही लक्षणे जाणून घेणे महत्वाचे ठरते. किडनीसंबंधित हे आजार तुम्हाला माहिती असायलाच हवे.

किडनीसंबंधित आजारांची कारणे

अशक्तपणा हे मूत्रपिंडाच्या समस्येचे मुख्य कारण आहे. यात तुम्हाला थकवा जाणवतो. आणि हालचाल करण्यासही त्रास होतो.

टाच, पाय किंवा घोट्याजवळ सूज येणे हे मूत्रपिंडाच्या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. (Kidney)

किडनी निकामी झाल्यास भूक मंदावते. युरिया, क्रिएटिनिन, अॅसिड यांसारखी विषारी द्रव्ये शरीरात जमा झाल्याने तुमच्या भूकेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. मूत्रपिंडाच्या आजारांमध्ये मळमळ आणि उलट्या होणे ही देखील लक्षणे दिसून येतात.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी हे सोपे उपाय करा

निरोगी किडनीसाठी भरपूर पाणी प्या. कोमट पाणी पिण्याचा प्रयत्म करा. यामुळे मूत्रपिंड शरीरातून युरिया आणि सोडियमसारखे विषारी पदार्थ शरीराबाहेर सोडतं.

वेळोवेळी कोलेस्टेरॉलची पातळी तपासा. त्यासाठी लिपिड प्रोफाइल चाचणी महत्वाची आहे.

तेलकट, फास्ट फूड आणि जंक फूड टाळा.

ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा.

निरोगी आहार निवडा आणि वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.

अन्नात मिठाचा वापर कमी प्रमाणात करा. पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फुड टाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com