Health : पोटात गॅस होण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health : पोटात गॅस होण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका

Health : पोटात गॅस होण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका

पोटात गॅसेस होणं खूप कॉमन आहे. गॅसेस होण हे आपल्या पचनशक्तीचा एक भाग आहे आणि याचा त्रास प्रत्येकाला होतोच. अनेकदा लोकं दिवसातून पाच ते पंधरा वेळेस गॅसेस बाहेर सोडत असतातसकाळी उठल्यावरती अनेशा पोटी पोट फुगणे; पोट साफ होण्यास त्रास होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा: Health : भोपळ्याच्या बिया खा, तंदुरुस्त रहा

पोटात गॅस तयार होणे सामान्य आहे. तुमची जीवनशैली आणि आहार काय आहे यानुसार तुम्हाला गॅसेसची समस्या तयार होते. यामुळे कधी कधी खूप जास्त त्रास होतो, अगदी छातीतही दुखते.आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सकाळी पोटात गॅस निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही काय खात आहात आणि काय नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Health Tips : महिलांनो शाकाहारी असाल तर सावधान? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

सकाळी पोटात गॅस निर्माण होण्याची कारणे जाणून घेऊया

१. तुम्ही आदल्या रात्री जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खाल्ले असतील तर

रात्रीच्या जेवणात जर तुम्ही खूप सॅलड खाल्ले असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पोटात गोळा येण्याचा आणि गॅसेसचा त्रास होतो. सोयाबीन, शेंगदाणे, फ्लॉवर, कोबी या पदार्थांमध्ये मुळातच नैसर्गिकरीत्या कार्बोहाइड्रेट जास्त असतात. त्यामुळे अनेकदा आपली आई देखील आपल्याला आपल्या आईने हे पदार्थ खातांना कमी खा म्हणून टोकले असेलच. जेव्हा या गोष्टींचे सेवन करता, तेव्हा पोटात असलेले सूक्ष्मजंतू त्यांना आंबवायला लागतात, ज्यामुळे CO 2, मिथेन आणि इतर प्रकारचे वायू तयार होऊ लागतात, ज्यामुळे तुम्हाला अन्न पचवण्यास त्रास होतो.

हेही वाचा: Health: स्तनाचा आकार सातत्याने वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या..असू शकतो 'हा' गंभीर आजार

२. भरपूर मसालेदार पदार्थ खाल्ल्याने

खूप तिखट मसाल्याचे पदार्थ खाणे आपल्या आतड्यांसाठी त्रासदायक असते. याने आतड्याची हालचाल जास्त सुरू होते परिणामी जास्त गॅसेस बाहेर पडतात.

३. कमी पाणी पिणे:

आपल्याला दिवसभरात शरीरात पाण्याची मुबलक गरज असते; अनेकदा कामाच्या गडबडीत आपण पाणी पेयला विसरतो. याच कारण अस आहे की, शरीराला पुरेपूर पाणी मिळालं नाही की तुमची विष्टा कोरडी होते, आणि मग शरीरातून बाहेर पडायला त्रास होतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पोटातले अन्न आंबायला लागल्यामुळे शरीरात हायड्रोजन, मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड तयार होतात, त्यामुळे तुमचे पोट फुग्यासारखे फुगायला लागते.

हेही वाचा: Health: चेहऱ्यावरील टॅन दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय!

४. मासिक पाळी दरम्यान

महिलांमध्ये सकाळी पोटात गॅस निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे मासिक पाळी येणे. मासिक पाळी दरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होतात; काही हार्मोन्स तुमच्या पोटाची मुख्यतः आतड्याची हालचाल कमी करतात आणि त्यामुळे अँसिदिटी आणि गॅसेसचा त्रास होतो. मासिक पाळी संपल्यानंतर, जास्त प्रमाणात गॅस तयार होण्याच्या समस्येपासून देखील सुटका होते. तुमच्या मासिक पाळीनंतर तुमचे पोट पुन्हा सामान्यपणे काम करू लागते.

हेही वाचा: Health Tips : वजन कमी करायचंय ? ‘हे’ आयुर्वेदीक चुर्ण आजच सुरू करा !

५. पोटाच्या संसर्गामुळे

सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या शरीरातून भरपूर गॅसेस बाहेर पडत असतील तर त्याच कारण आतड्यात संसर्ग झाला आहे असेही असू शकते. H. pylori नावाचा बॅक्टेरिया तुमच्या पोटात संसर्ग तयार करून पसरवतो. हा बॅक्टेरिया थुंकी, उलटी आणि अस्वच्छ पाण्यापासून बनवलेले अन्न खाल्ल्याने पसरतो. H. pylori ही सामान्य गोष्ट आहे आणि अनेकांना या संसर्गाचा सामना करावा लागतो.

हेही वाचा: Health: आरोग्याचा खजिना नारळ! पण जरा जपून खा, नाहीतर..

गॅसेस आणि ब्लोटिंग शिवाय H. pylori बॅक्टेरियाची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात ही लक्षणे दिसतात.

- ओटीपोटात दुखणे आणि जळजळ होणे

- ओटीपोटात दुखणे जे तुमचे पोट रिकामे असताना तीव्र होते. - मळमळ

- भूक न लागणे

- सतत ढेकर येणे

- कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे

काही वैद्यकीय परिस्थितींमुळे पोटात खूप गॅस तयार होतो. जसे की डायव्हर्टिकुलिटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, मधुमेह, थायरॉईड डिसफंक्शन किंवा आतड्यांसंबंधी अडथळा.