Cholesterol Control : या टेस्टी डेअरी प्रोडक्टने झटक्यात कमी होईल बॅड कोलेस्ट्रॉल l health tips dairy product butter milk control bad cholesterol know health care tips and chaach recipe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cholesterol Control

Cholesterol Control : या टेस्टी डेअरी प्रोडक्टने झटक्यात कमी होईल बॅड कोलेस्ट्रॉल

Cholesterol Control : हल्ली फास्ट फूडच्या सेवनाने आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना कोलेस्ट्रॉलच्या गंभीर समस्या उद्भवताय. तेव्हा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी घरच्या घरी प्रभावी उपाय कोणता ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंड पेय थंड ठेवण्यास मदत करते. यासोबतच घरीच ताक बनवत तुम्ही बॅड कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नियंत्रणात आणू शकता.

ताक प्यायल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो

वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे आपल्यासाठी गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीज होण्याचा धोका असतो. अशावेळी ताक नक्कीच प्यावे.

घरच्या घरी ताक बनवण्यासाठी लागणारी सामग्री

  • १/२ कप दही

  • दीड कप पाणी

  • जवस

  • जिरे

  • मेथी दाणे

घरीच ताक कसे बनवाल?

1. सर्व प्रथम, दही आणि पाणी घ्या आणि त्याला चांगले मिसळून घ्या. नीट फेटा आणि नंतर बाजूला ठेवा. (recipe)

2. आता जवस, जिरे आणि मेथीचे दाणे समान प्रमाणात घेऊन बारीक वाटून घ्या.

3. शेवटी, एका ग्लासमध्ये ताक टाका आणि 1 टेबलस्पून जवस, जिरे आणि मेथीचे मिश्रण चांगले मिसळा.

4. हे ताक तुम्ही दुपारच्या जेवणासोबत किंवा दुपारी 3-4 च्या सुमारास जेवणानंतर सेवन करू शकता. ताक वजन कमी करण्याबरोबरच बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यातही प्रभावी ठरते.

ताक प्यायल्याने शरीरही थंडे राहाते. अनेकांचे शरीर तापमान आतून फार तापलेले असते. तेव्हा तुमच्या शरीरातील हिट बाहेर काढण्यास ताक फायदेशीर आहे. ताक तुम्ही सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीच्या जेवणात कधीही घेऊ शकता. ताक प्यायलाही चविष्ट लागते. (Health News)