Health Tips : चपाती दिवसातून किती आणि कधी खावी, माहितीये l Health Tips How Many Chapati Should Eat In A Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips : चपाती दिवसातून किती आणि कधी खावी, माहितीये?

How Many Chapati Should Eat In A Day : भारतीय जेवणात वरण भात, भाजी पोळी या पदार्थांचा नेहमीच समावेश असतो. याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. जर तुम्ही कोणाला विचारलं की, तुम्ही चपाती कधी खातात, तर बहुतेकांचं उत्तर असेल दोन्ही वेळी. तर काही लोक दिवसा किंवा काही रात्री चपाती खातात.

पण तुम्हाला चपाती कोणत्या वेळी खाणे योग्य आहे हे माहितीये का? जाणून घेऊया

health Tips

health Tips

रात्री चपाती खावी की नाही?

चपातीमध्ये मोठ्याप्रमाणात कॅलरीज आणि कार्ब्ज असतात. जर तुम्ही रात्री चपाती खात असाल तर त्याला पचायला फार वेळ लागतो. शिवाय यामुळे शुगर लेव्हल वाढण्याचाही धोका असतो. गव्हाच्या चपातीत ७१ कॅलरीज असतात. जर तुम्ही रात्री २ चपात्या खात असाल तर यामुळे तुमच्या शरीरात १४२ कॅलरीज तयार होतात. त्यामुळे रात्री चपाती खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. अर्थात रात्रीच्या जेवणात पोळी/ चपाती खाणं आरोग्यासाठी फायदेयुक्त नाही.

health Tips

health Tips

किती चपात्या खाव्या?

जर तुम्ही चपात्या खात असाल तर २ पेक्षा जास्त चपात्या खाऊ नका. शिवाय खाल्ल्यानंतर वॉक नक्की करा. रात्रीचं जेवण लवकर करा. ज्यामुळे योग्य पचन होईल. तुम्हाला हवं तर तुम्ही १ चपाती खा आणि त्यासोबत सलाद आणि वरण, भाजीचे प्रमाण जास्त ठेवा.

थेट गॅसवर चपाती / फुलका शेकण्याचे दुःष्परिणाम

लोक वेळ वाचवण्यासाठी थेट गॅसवर चपाती/फुलका शेकतात. पण असं करणं आरोग्यासाठी घातक असतं. थेट गॅसवर शेकलेल्या पोळ्यांमध्ये भरलेली हवा आरोग्यासाठी घातक ठरते. म्हणून पोळी शेकण्याचे इतर पर्याय वापरावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :DinnerrotiDeshi Roti