Health Tips : स्मोकिंग सुटत नाहीये? औषधं नाही तर योगासने करतील मदत | Health Tips How to left smoking without medicine with the help of Yoga | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stop smoking
Health Tips : स्मोकिंग सुटत नाहीये? औषधं नाही तर योगासने करतील मदत

Health Tips : स्मोकिंग सुटत नाहीये? औषधं नाही तर योगासने करतील मदत

धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. धूम्रपानामुळे हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. पण ही सवय सोडणं तितकं सोपंही नाही. कोणत्याही आजारावर उपचार करण्याआधी डॉक्टरही रुग्णांना धूम्रपान सोडण्याचा सल्ला देतात. ही सवय कशी सोडवावी?

धूम्रपानाच्या व्यसनामुळे कॅन्सर, हृदयविकार, पक्षाघात, फुफ्फुसाचे आजार, मधुमेह आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांचा धोका वाढतो. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की धूम्रपानाचं व्यसन सोडणं सोपं नाही. लोकांना इच्छा असूनही धूम्रपानाची सवय सुटत नाही. जर तुम्हाला धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही अनेक उपाय करू शकता. मात्र, त्यासाठी जिद्द असली पाहिजे.

कोणत्याही व्यसनापासून मुक्त होण्यासाठी व्यक्तीने मानसिक तयारी केली पाहिजे. मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि धूम्रपान करण्याची इच्छा कमी करण्यासाठी योगासने करणं उपयुक्त आहे. धूम्रपानाची सवय सोडण्यास मदत करण्यासाठी काही योगासनं आहेत. (Health Tips)

कपालभाती

कपालभाती प्राणायामाचा सराव धूम्रपान सोडण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. कपालभातीच्या सरावाने मानसिक आरोग्य सुधारतं. कपालभाती प्राणायाम रक्ताभिसरण सुधारून आणि मध्यवर्ती मज्जासंस्था (CNS) नियंत्रित करून कार्य करते. यामुळे मेंदूची शक्ती वाढते आणि धूम्रपान करण्याची इच्छा कमी होते.

बालासन

धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी बालासनाचा सराव फायदेशीर ठरतो. या आसनाच्या सरावाने मज्जासंस्था आणि तणाव शांत राहण्यास मदत होते. पोट आणि पाठीच्या समस्यांमध्येही बालासन योगाचा सराव फायदेशीर आहे. स्नायूंना आराम देण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी बालासन करावं.

भुजंगासन

सिगारेट किंवा गुटखा जास्त खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका असतो. हा धोका कमी करण्यासाठी आणि धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. भुजंगासनाच्या सरावाने मन शांत राहण्यास मदत होते. धूम्रपान केल्यानं निकोटीनची सवय सुटू शकते. यासोबतच पाठ आणि कंबरेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी भुजंगासनाचा सरावही करता येतो.

टॅग्स :smokinghealth