esakal | अंगिकारा 'या' ८ सवयी अन् कोरोनाला ठेवा दूर!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

अंगिकारा 'या' ८ सवयी अन् कोरोनाला ठेवा दूर!

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून प्रत्येकाची डोकेदुखी ठरलेल्या कोरोना विषाणूची लवकरच तिसरी लाट येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुले व तरुणांना अधिक धोका असून स्वत:ची व कुटुंबाची जास्तीत जास्त काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तीन प्रमुख उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. यात सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि मास्क वापरणे या तीन गोष्टी आवर्जुन केल्या पाहिजेत. सोबतच आपल्या दैनंदिन सवयींमध्येदेखील काही महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे. म्हणूनच, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपल्या सवयींमध्ये कोणते बदल करणं अपेक्षित आहे हे पुण्यातील M.D.D.P.C डॉ. मर्दा घनश्याम (drgmarda@gmail.com) यांनी सांगितलं आहे. (Help keep COVID-19 : 8 healthy habits and behaviors)

कोरोनापासून वाचण्यासाठी करा 'हे' उपाय

१. दिवसातून दोन ते तीन वेळा दोन्ही नाकपुड्यांमध्ये तेल/तूप लावा.

२. दिवसातून तीन वेळा कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा.

३. इतरांशी बोलतांना किंवा घरातून बाहेर पडतांना मास्क लावा.

४. कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचं पालन करावं. मित्रपरिवाराशी बोलतांना दीड ते दोन मीटरचं अंतर जपावं.

हेही वाचा: भन्नाट आजोबा; बॉडीलोशनप्रमाणे करतात सॅनिटायझरचा वापर

५. समोरासमोर कधीही बोलू नये. एखादी व्यक्ती समोर असेल तर आपण तिरक्या पद्धतीने उभं राहून बोलावं. ज्यामुळे थेट समोरासमोर संपर्क होऊन जंतूसंर्सगाचा प्रसार होणार नाही.

६.गर्दीची ठिकाणं टाळावीत.

७. आपल्या संपर्कातील व्यक्तीला कोरोना झाल्यास त्याच्याशी थेट संपर्क टाळावा. त्यांच्या कोणत्याही वस्तू वा सामानाला स्पर्श करताना ग्लोव्हस घालावेत.

८. रात्री लवकर झोपावे व सकाळी उठल्यावर प्राणायाम करावा.

loading image