Daily Salt Intake: दिवसभरात किती मीठ खावे, जाणून घ्या जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम | how much salt is needed per day | salt disadvantages | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Salt Intake for healthy lifestyle

Daily Salt Intake: दिवसभरात किती मीठ खावे, जाणून घ्या जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम

Daily Salt Intake: जेवणाची चव वाढवण्यासोबतच मीठ आपल्याला निरोगी ठेवण्यासही मदत करते. पण जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उन्हाळ्यात जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनचा धोकाही असू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मीठ मर्यादित प्रमाणातच वापरावे.

अशा परिस्थितीत दिवसात मीठ किती खावे असा प्रश्न पडतो. बाजारात उपलब्ध असलेल्या पिझ्झा-बर्गरमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक आढळते. हे पदार्थ जास्त खाल्ल्याने आपल्या आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया दिवसभरात मीठ किती प्रमाणात सेवन करावे.

एका दिवसात किती मीठ खावे? (How much salt is needed per day)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज फक्त 5 ग्रॅम पेक्षा कमी मीठ खावे. यापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अनेक उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, आहारातील सुमारे 75 टक्के मीठ प्रोसेस्ड फूड आणि बाहेर तयार केलेल्या अन्नातून येते.

जास्त मीठ खाण्याचे तोटे (salt disadvantages)

हृदयासाठी हानिकारक: दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने हृदयाला हानी पोहोचू शकते. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका असू शकतो.

पचनाशी संबंधित समस्या: याशिवाय जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पोट फुगणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या असू शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मीठाचे सेवन कमी करा.

किडनीच्या समस्या: मीठामुळे तुमच्या किडनीलाही समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू लागते, ज्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होऊ लागतो. यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

टॅग्स :lifestylesalt