
Parivarta Utkatasana : परिवर्त उत्कटासन
हे दंडस्थितीमधील आसन आहे. हे आसन सोपे दिसले, तरी त्या स्थितीमध्ये स्थिर राहिल्यानंतर त्याचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.
असे करावे आसन
प्रथम ताठ उभे राहावे. दोन्ही पायात साधारण खांद्याएवढे अंतर घ्यावे.
आता गुडघे वाकवून उत्कटासनमध्ये यावे. म्हणजेच दोन्ही गुडघे वाकवून दोन्ही मांडी व पोटरी यामध्ये काटकोन होईल, मांडी जमिनीला समांतर ठेवावी.
दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घ्यावे. श्वसन संथ सुरू ठेवावे.
आता उत्कटासनमधून परिवर्त उत्कटासनामध्ये जाताना कंबरेतून डाव्या बाजूला प्रथम वळावे.
त्यानंतर उजव्या हाताच्या दंडाने व कोपराने डाव्या मांडीला रेटा द्यावा. मानसुद्धा डाव्या बाजूला वळवावी.
छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा.
गुडघे वाकविल्यावर बोटांच्या पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
शक्य तेवढा वेळ आसनस्थितीमध्ये स्थिर राहावे. श्वास संथ सुरू ठेवावा. नजर स्थिर ठेवावी.
आसन सोडले की दुसऱ्या बाजूनेही करावे.
आसनाचे फायदे
या आसनाच्या नियमित सरावाने पायाच्या स्नायूंची ताकद वाढते.
पायातील विशेषतः मांडीची शक्ती वाढते. पायदुखी कमी होऊ लागते.
मांडीची पोटावरची कंबरेतील अतिरिक्त चरबी कमी होते.
पोटाला पीळ बसल्याने पचन व संस्थेचे कार्य सुधारते.
गॅसेस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन हे त्रास कमी होतात. मधुमेह, पाठदुखी, कंबरदुखीवर उपयुक्त.
मुलांना एकाग्रता वाढण्यास, चिडचिड कमी होण्यास उपयोगी.
गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आसन करू नये.