जीम की योगा,आरोग्यासाठी काय आहे चांगले? Delhi AIIMSच्या अभ्यासात झाले उघड

दिल्लीच्या एम्सने केलेल्या अभ्यासामध्ये जीम जाणाऱ्या आणि योगा करणाऱ्यांमध्ये फरक दिसून येत आहे.
Is it better to go to the gym or do yoga, revealed in the study of Delhi AIIMS
Is it better to go to the gym or do yoga, revealed in the study of Delhi AIIMS
Summary

योग महोत्सवात आयुष सचिव आणि वैद्य पद्मश्री राजेश कोटेचा यांनी योगाचे विशेष फायदे सांगितले. त्यांनी एम्स दिल्लीच्या अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे की, आरोग्याच्य दृष्टीने योगाचे लक्षणीय महत्त्व दिसून येत आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे (आईडीवाई-2022) काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या काऊंटडाऊनचे उद्धघाटनाच्या स्वरुपामध्ये योग महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी विज्ञान भवन येथे केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत अनेक केंद्रीय मंत्रालयांच्या सहभागाने योग महोत्सवात सांगण्यात आले की, ''पुढील 100 दिवस देश-विदेशात कार्यक्रम आयोजित केले जातील.''

भारतातील आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या काऊंटडाऊननिमित्त उपस्थित असलेले केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, ''योग आणि पारंपारिक औषधांच्या क्षेत्रात भारत जगामध्ये आघाडीवर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात पारंपारिक औषधांसाठी जागतिक केंद्राच्या स्थापनेला मान्यता देऊन भारताची जबाबदारी वाढवली आहे.

Is it better to go to the gym or do yoga, revealed in the study of Delhi AIIMS
कर्नाटकात हिजाब वाद सुरुच; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!

सोणोवाल म्हणाले की, ''आंतरराष्ट्रीय योग महोत्सवांचे सातत्याने आयोजन केल्यामुळे आज योग संपूर्ण जगात शांततेचे प्रतीक बनले आहे आणि ते जगातील सर्वात मोठे सार्वजनिक आरोग्य अभियान असल्याचे सिद्ध होत आहे. ते म्हणाले की, ''IDY-2022 च्या 100 दिवसांच्या काउंटडाऊनची ही मोहीम म्हणजे आजार, तणाव आणि नैराश्य यापासून मुक्त होण्याचा प्रवास असून त्यात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघातून योगाच्या संदर्भात सुरू केलेला प्रवास आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

योग महोत्सवामध्ये उपस्थितीत आयुष सचिव आणि वैद्य पद्मश्री राजेश कोटे यांचा योगमुळे आरोग्यास होणाऱ्या फायद्यांबाबत विशेष गोष्टी शेअर केली. त्यांनी एम्सच्या दिल्लीतील एक अहवालाची माहिती देताना सांगितले की, आरोग्यासाठी योगाच महत्त्व सिद्ध झाले आहे. एम्सद्वारे जीममध्ये जाणाऱ्या आणि योगा करणाऱ्यादरम्यान तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यामध्ये समोर आले की, योगाभ्यास करणाऱ्यांमध्ये सतो गुण आणि व्यायामशाळेत जाणाऱ्यांमध्ये रजोगुण आणि तमोगुण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

Is it better to go to the gym or do yoga, revealed in the study of Delhi AIIMS
कर्नाटकात हिजाब वाद सुरुच; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!

राष्ट्रीय योग संस्थेचे संचालक मोरारजी देसाई, डॉ. ईश्वर व्ही. बसवरेड्डी यांनी माहिती दिली की, 100 दिवसांच्या काउंटडाऊन प्रवासात 100 शहरांमधील 100 हून अधिक योगाशी संबंधित संस्था विविध योग कार्यक्रमांचे आयोजन करतील आणि योग दिनानिमित्त योगाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. 21 जून ला 75 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांवर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयासह इतर अनेक मंत्रालये IDY मध्ये थेट सहकार्य करत आहेत. हा कार्यक्रम योगाला जगातील सर्वात मोठी मोहीम बनवण्याचा प्रयत्न आहे.

यावेळी उपस्थित असलेले केंद्रीय कामगार, रोजगार आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, ''हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक जीवनशैली ही आज जगाची सर्वात मोठी गरज आहे आणि योगा ते सिद्ध केले आहे. ते म्हणाले की, ''आम्ही 3 दशलक्ष हेक्टर पडीक जमीन हिरवीगार करण्याचा निर्णय घेतला आहे. योग हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. योगाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे. त्यांनी आयुष मंत्रालयाला 52 व्याघ्र संवर्धन केंद्रे आणि 49 निवडक तलावांजवळ IDY-2022 काउंटडाउन कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती केली. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय 160हून अधिक देशांमध्ये आयुष मंत्रालयासोबत IDY अंतर्गत आयोजित योग कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.

दुसरीकडे, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, ''यावेळी संपूर्ण जगाने आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योगाशिवाय दुसरा मार्ग नाही. कोरोनाच्या काळात सर्वांच्या लक्षात आले आहे की, मानसिक संतुलनाशिवाय दुसरे काही नाही आणि योग जीवनात संतुलन निर्माण करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com