Health Tips: उन्हाळ्यात मुळा आणि गाजर एकत्र खाताय, मग हे वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Combinations

Health Tips: उन्हाळ्यात मुळा आणि गाजर एकत्र खाताय, मग हे वाचाच

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारचे पदार्थ खातात ज्यामुळे त्यांचे पोट थंड राहते. पण काही चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे आरोग्यचे नुकसान होते. सर्वप्रथम मुळा आणि गाजर बद्दल बोलूया. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही चिंता न करता मुळा आणि गाजर एकत्र खाऊ शकता. दोन्ही सलाडमध्ये एकत्र खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही.

दुसरीकडे, मुळा पाण्याने भरलेला असतो, ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो, पण यासोबत काही खास गोष्टी खाल्ल्या तर तुमचे आरोग्य बिघडायला वेळ लागणार नाही. आज जाणून घेऊया की मुळासोबत कोणते पदार्थ खाल्ल्याने पोटासाठी हानिकारक ठरू शकते.

मुळा आणि कारले

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फक्त मुळा खाल्ल्यास फायदा होतो, पण जर तुम्ही मुळासोबत कारले खाल्ले तर तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. या दोन्ही पदार्थांमध्ये आढळणारे घटक पोटात एकत्र मिसळल्यास एसिडिक रिएक्शन होऊ शकते. त्यांचे एकत्र सेवन केल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

मुळा आणि काकडी

काकडी मुळासोबत खाऊ नये. पहिली गोष्ट म्हणजे मुळा आणि काकडी या दोन्हीमध्ये भरपूर पाणी असते आणि दोन्ही एकत्र खाल्ल्यास शरीरात जास्त पाणी गेल्याने पोट खराब होऊ शकते.

दुसरी खास गोष्ट म्हणजे काकडीत आढळणारा एस्कॉर्बेट हा घटक शरीरात व्हिटॅमिन सी शोषून घेतो. मुळ्यासोबत खाल्ल्यास पोटात अपचन, पोट फुगणे इत्यादी समस्या होऊ शकतात. त्यामुळे हे दोन्ही एकत्र सेवन करू नये.

मुळा आणि संत्रा

खरे तर या दोघांचे मिश्रण पोटासाठी घातक आहे. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास पोटात गॅस, अपचन, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच मुळासोबत संत्र्याचे सेवन करू नये.

मुळा आणि दूध

मुळा आणि दुधाचे एकत्र सेवन करणे अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले जाते. मुळा आणि दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे परिणाम वेगळे असतात. मुळासोबत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ घेतल्यास पोट खराब होऊ शकते. अपचन, गॅस, पोटात गोळा येणे यासोबतच तुम्हाला उलट्या आणि मळमळण्याची समस्याही होऊ शकते.