Best Cancer Treatment Hospitals : हे आहेत महाराष्ट्रातील सर्वात्तम कॅन्सर हॉस्पिटल | Best cancer hospital in Mumbai and Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Cancer Hospitals in Maharashtra

Best Cancer Hospitals: हे आहेत महाराष्ट्रातील सर्वात्तम कॅन्सर हॉस्पिटल

Best Cancer Hospitals in Maharashtra: गेल्या काही वर्षांमध्ये मोठमोठ्या आजारांवर Illness अद्यावत उपचाप पद्धती सुरु करण्यात आल्याने अशा आजारांचं वेळेत निदान होवून उपचार करणं शक्य झालं आहे.

यापैकीच एक म्हणजे कॅन्सर Cancer. काही वर्षांपूर्वी कॅन्सर म्हंटलं की मृत्यू अशी साधारण लोकांची धारणा होती. Know Best Hospitals for Cancer Treatment in Maharashtra

मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरवर Cancer मोठं संशोधन झालं असून आधुनिक उपचार पद्धतीमुळे कॅन्सरशी लढा देणं सोप झालं आहे. तसचं ऑन्कोपॅथॉलॉजीमुळे कॅन्सरचं वेळीत निदान शक्य झालं आहे.

कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यावर ताबडतोब उपचार Treatment करणं गरजेचं आहे. वेळीच उपचार सुरु झाल्यास कॅन्सरवर मात करणं शक्य आहे. मात्र अनेकांना कॅन्सरच्या उपचारांसाठी कोणता दवाखाना निवडावा असा प्रश्न पडतो यासाठीच आम्ही तुम्हाला महाराष्ट्रीत कॅन्सरवर उपचार करणारी काही सर्वेत्तम रुग्णालयं सांगणार आहोत.

टाटा मेमोरियल सेंटर

खरं तर महाराष्ट्रात कॅन्सरवर उपचार करणारी अनेक रुग्णालयं आहेत. मात्र यातील मुंबईमध्ये असलेलं टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर हे राज्यातच नव्हे तर देशातील कॅन्सरच्या उपचारांसाठी लोकप्रिय आणि सर्वोत्तम रुग्णालय आहे.

कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरवर इथं उपचार केले जातात. या रुग्णालयात राज्यतूनच नव्हे तर देशभरातील रुग्ण उपचारासाठी येतात. टाटा मेमोरियल रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरव मोफत उपचार केले जातात.

टाटा मेमोरियल सेंटरची नवी मुंबई इथं असलेल्या शाखेतही कॅन्सरवर उपचार केले जातात. इथंही जवळपास ७० टक्के रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.

हे देखिल वाचा-

यासोबतच महाराष्ट्रात इतरही काही सरकारी, निम सरकारी, खासगी आणि शासन मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार केले जातात. यातील अनेक रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्यासाठी मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार उपलब्ध आहेत. पाहुयात राज्यातील काही इतर कॅन्सर रुग्णालयं...

मुंबईतील कॅन्सर रुग्णालयं- मुंबईमध्ये कॅन्सरवरील उपचारासाठी अनेक नावाजलेली रुग्णालये आहेत. यामध्ये नानावटी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर, लिलावती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पीटल, जसलोक हॉस्पिटल आणि कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालय तसचं अपोलो हॉस्पिटल आणि हिंदूजा या ठिकाणी कॅन्सरचे उपचार केले जातात.

त्याचप्रमाणे ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटल या ठिकाणीदेखील कॅन्सरवर उपचार केले जातात.

मुंबईतील या काही प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम आणि अद्यावत व्यवस्था उपलब्ध आहे.

पुण्यातील कॅन्सर रुग्णालयं- मुंबईप्रमाणाचे पुण्यातही कॅन्सवर उपचार करण्यासाठी मोठी रुग्णालये आहेत.

यात अपोलो जहांगीर, दीनदयाळ नॅशनल हॉस्पिटल पुणे, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड सिसर्च सेंटर, रुबी हॉल क्लिनिक, विलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटल, एम. एन बुधरानी कॅन्सर हॉस्पिटल, आदित्य बिरला मेमोरियल हॉस्पिटल ही रुग्णालय कॅन्सरच्या उपचारांसाठी नावाजलेली आहेत.

त्याचसोबत सह्याद्री स्पेशलिटी हॉस्पिटल, कोलंबिया एशिया हॉस्पिटल आणि इनामदार मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल, रांका हॉस्पिटल ही पुण्यातील कॅन्सरच्या उपचारांसाठी सर्वोत्तम अशी रुग्णालयं आहेत. या रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या उपचारांसाठी कुशल डॉक्टरांची टीम तसचं नवं तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

हे देखिल वाचा-

नागपूर- तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातही कॅन्सरच्या उपचारांसाठी अद्यावत तंत्रज्ञान आणि उत्तम डॉक्टरांची टीम असलेली अनेक रुग्णालय आहेत.

यातील महत्वाच्या रुग्णालयांमध्ये नॅशनल कॅन्सर इंस्टीट्यूट, अमेरिकन ऑन्कॉलॉजी सेंटर, तसचं मानधनिया कॅन्सर हॉस्पिटल & रिसर्च सेंटर, HCG कॅन्सर केअर या हॉस्पिटल्सचा समावेश आहे.

त्याचसोबत ऑरेंज सिटी हॉस्पिटल, तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल, न्यू एरा ही देखील कॅन्सरवर उपचार करणारी काही नागपूरमधील रुग्णालयं आहेत.

औरंगाबाद- औरंगाबादमध्ये मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कमलनयन बजाज हॉस्पिटल, शेठ नंदलाल धूत हॉस्पिटल हे काही कॅन्सरवर उपचार करणारे हॉस्पिटल्स आहेत.

यासोबतच महाराष्ट्राचा विचार करता नाशिकमधील HCG मानवता कॅन्सर केअर सेंटर आणि Apex वेलनेस ही कॅन्सरसाठी उत्तम रुग्णालयं आहेत.

टॅग्स :CancerHospital