सावधान! दिवसा डुलक्या येणे असू शकते अल्झायमरचे लक्षण

Long naps may be early sign of Alzheimer's disease study
Long naps may be early sign of Alzheimer's disease study

Symptoms of Alzheimer’s: तुम्ही जर दिवसा डुलक्या काढत असाल तर सावध राहा. ब्रिंघम अॅन्ड वुमन हॉस्पिटलचे (Brigham and Women’s Hospital)रिसर्चमध्ये समोर आले आहे की, दिवसा डुलक्या काढण्याची संख्या वाढत असेल तर भविष्यात (Alzheimer’s dementia) होण्याचा धोक्याचे लक्षण असू शकतो. तसेच हे देखील सांगितले की, डिमेंशियामुळे दिवसा झोपा काढण्याची शक्यता वाढू शकते. ब्रिंघममध्ये डिव्हिजन ऑफ स्लिप अन्ड सक्रैंडियन (Division of Sleep and Sacrandian) डिसऑर्डरच्या मेडिकल बायोडानॉमिक्सच्या प्रोग्रामच्या संशोधक पेंग ली (Peng Li)यांनी सांगितले की, वयस्क लोकांची दिवसा झोपण्याची सवयीकडे दुर्लक्ष करू नका.

पेंग लीने सांगिलतले की आमच्या संशोधनाचा निष्कर्ष हे स्पष्ट करतो की, दिवसा झोपा काढणे अल्झायमर डिमेंशिआ वाढण्याच्या धोक्याचे लक्षण आहे, पण काळानुसार यामध्ये वाढत्या आरोग्याच्या समस्या देखील वाढतात. त्यामुळे २४ तासांमध्ये झोपण्याची सवयीकडे लक्ष देणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या संशोधनानुसार, स्टडी निष्कर्षानुसार ‘अल्जाइमर्स एंड डिमेंशिया : द जर्नल ऑफ द अल्जाइमर असोसिशमध्ये प्रकाशित केले आहे. दिवसा झोपा काढणे वयस्क लोकांच्या स्मरणशक्तीवर(memory power) काय परिणाम होतो याविषयी परस्परविरोधी निष्कर्ष निघाले आहेत.

मागील अभ्यासात काय निष्पन्न झाले

काही अभ्यासातून असे दिसून आले आहे , दिवसा झोप घेतल्याने आकलन क्षमतेवर, मूडवर आणि सतर्कतेवर सकारात्मक परिणाम होतो. काही इतर अभ्यासांनी कलन क्षमतेवर नकारात्मक परिणाम नोंदवले आहेत. परंतु ब्रिंगहॅमच्या संशोधकांना असे आढळून आले आहे की, पूर्वीच्या अभ्यासांनी एक वेळच्या व्यक्तिनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरात निष्कर्ष काढले आहेत. म्हणून त्याने दिवसा डुलकी काढणे आणि अल्झायमर डिमेंशियाच्या जोखमीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले.

अभ्यास कसा झाला

अभ्यासासाठी 1000 हून अधिक लोकांचा डेटा गोळा करण्यात आला. सरासरी वय 81 वर्षे होते. डुलकी, त्याची वारंवारता आणि वेळ याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी त्यांना 14 दिवसांसाठी एक विशेष उपकरण देण्यात आले. या संशोधनातून असे आढळून आले की, डुलकी घेण्याची वेळ आणि वारंवारता अल्झायमर डिमेंशियाशी संबंधित आहे आणि दिवसा डुलक्या काढण्यामध्ये ही प्रकरणे जास्त असल्याचे दिसून आले. डिमेंशियाच्या स्वतंत्र घटकांमध्ये वय आणि रात्री वारंवार झोप मोडणे यांचा समावेश होतो.

संशोधकांच्या मते, ''वर्षानुवर्षे झोपेची वेळ आणि त्याची वारंवारता वाढल्याने अल्झायमर डिमेंशियाचा वेग वाढतो. पेंग ली म्हणाले की, ''अल्झायमर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यात झोपेची भूमिका आणि दिवसा झोपेची भूमिका (vicious circle)अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ शकते असे आम्हाला आढळून आले.

संशोधकांनी या अभ्यासाच्या तीन मर्यादा देखील मान्य केल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे झोपेच्या सवयींचे मूल्यांकन करण्यासाठी मानक पद्धतींसह(The standard method)डेटा संकलित केलेला नाही. दुसरे, या अभ्यासात सहभागी असलेले लोक वृद्ध होते, त्यामुळे निष्कर्ष तरुण लोकसंख्येला त्याच प्रकारे लागू होऊ शकत नाहीत. तिसरे, दिवसाच्या झोपेच्या आधारावर भविष्यातील अभ्यासामध्ये आकलन क्षमतेतील घट (cognitive decline)तपासली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com