
Mango Leaf Health Benefits : आंब्याच्या पानांत दडलाय आरोग्याचा मंत्र...
Mango Leaf Health Benefits : उन्हाळा लागला सुरु झाला की, सगळ्यांना आंबे खाण्याचे वेध लागतात. कारण हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येतो. पण आंब्याचं झाड मात्र वर्षभर बहरलेलं असतं. आंब्याची गोडी जशी प्रत्येकाला हवी हवीशी असते तसे ही आंब्याची पाने प्रत्येक पूजा कार्यात, सणसमारंभात फार महत्वाची मानली जातात. दारात तोरण बांधताना आंब्याची पानं लावली जातात. यामुळे नकारात्मक शक्ती घरात शिरत नाही असं मानलं जातं.
पण या पानांचं फक्त धार्मिकच नाही तर आयुर्वेदिक महत्वदेखील खूप आहे. ही पानं डायबेटीसपासून, किडनी स्टोनपर्यंत बऱ्याच आजारांवर गुणकारी आहेत.
आंब्याच्या पानांतील गुण आणि महत्व
आंब्याच्या पानांमध्येपण व्हिटॅमिन, एंझाइम, अँटीऑक्सिडंट आणि मँगिफेरीन नावाचे पोषक तत्व असतात.
मधुमेह - आंब्याच्या पानांमध्ये टॅनिन आणि एंथोसायनिन असतात. या दोन्हीमुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होते.
सांधे दुखी - आंब्याची पानं पाण्यात उकळवून याचं नियमित सेवन केल्याने सांधे दुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते.
अतिसार - आंब्याची पानं स्वच्छ धूवून सुकवून घ्या. त्याची पावडर बनवून घ्या. ही पावडर पाण्यासोबत घेतल्याने आराम मिळतो.
ब्लड प्रेशर - रोज एक कप पाण्यात आंब्याची पानं उकळवून ते पाणी नियमित प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.
किडनी स्टोन - किडनी स्टोनच्या त्रासावरही आंब्याची पानं गुणकारी ठरतात.
श्वसनासंबंधीचे आजार - आंब्याच्या पानांना पाण्यात उकळवून त्यात मध मिसळून प्यावे. हे पेय सर्दी, अस्थमाच्या लोकांसाठी गुणकारी ठरतं.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.