Food For Eyes: या पदार्थांच्या सेवनामुळे दृष्टी होईल चांगली, निरोगी डोळ्यांसाठी आहारात आजच सामील करा हे पदार्थ

जर तुम्हाला डोळे निरोगी ठेवायचे असतील तर त्यांना पोषण मिळणं गरजेचं आहे. यासाठी आहारामध्ये कोणत्या पोषक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. ते पाहुयात
डोळ्यांना पोषक भाज्या आणि फळं
डोळ्यांना पोषक भाज्या आणि फळंEsakal

डोळे आणि दृष्टीमुळं आपल्याला हे सुंदर जग पाहणं शक्य होतं. डोळ्यांमुळेच आपल्याला सभोवतालच्या जगातील सुंदर रंग आणि अनेक सुंदर गोष्टी पाहतात येतात. यासाठी डोळे Eyes, नजर किंवा आपली दृष्टी Eye Sight चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. Marathi Health Tips Try This Vegetables to keep you eye sight clean

अलिकडे मोबाईल Mobile आणि गॅजेट्सच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. तसचं कमी वयातच दृष्टी कमकुवत होवू लागते. वाढत्या वयातही डोळे Eyes आणि दृष्टी चांगली ठेवाय़ची असेल तर आतापासूनच आहारामध्ये Diet काही पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे.

अनेकजण डोळ्यांना आराम मिळाला यासाठी डोळ्याचे विविध ड्रॉप्स वापरतात. तसचं काकडी Cucumber किंवा बटाट्याच्या Potato स्लाइस डोळ्यांवर ठेवणे असे उपाय करतात. यामुळे डोळ्याला तात्पुरता थंडावा मिळल्याने आराम वाटतो.

जर तुम्हाला डोळे निरोगी ठेवायचे असतील तर त्यांना पोषण मिळणं गरजेचं आहे. यासाठी आहारामध्ये कोणत्या पोषक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. ते पाहुयात.

रताळं- अनेकदा वय वाढत गेलं की दृष्टी कमी होवू लागते. काहींना तर उतारवयात आंधळेपण देखील येत. या समस्येपासून दूर राहायचं असेल तर आहारामध्ये रताळं नक्की खा. रताळ्यामध्ये असलेलं बीटा कॅरेटीन हे डोळ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तसचं आंधळेपण दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

गाजर- गाजराचं सेवन हे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजरामध्ये ल्यूटीन आणि बीटा कॅरेटीन हे गुणधर्म आढळतात. ज्यामुळे डोळे आणि दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. तसचं गाजरमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए Vitamin A मुळे देखील डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही आहारामध्ये सॅलेड, ज्यूस किंवा सूपच्या स्वरुपात गाजराचा समावेश करू शकता.

बदाम- बदाम हे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासोबतच तुमची दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी दररोज सकाळी ४-५ भिजवलेले बदाम खावे. बदामामध्ये असलेल्या विटामिन ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुळे डोळ्यांची जळजळ कमी होते तसचं नजर तीक्ष्ण होण्यास मदत होते.

संत्र- संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी Vitamin C आढळतं. त्याचसोबत यात व्हिटॅमिन ए देखील मोठ्या प्रमाणात आढळतं. जे निरोगी डोळ्यांसाठी गरजेचं असतं. संत्र्याच्या सेवनामुळे कॅल्शियमची कमतरतादेखील भरून निघते.

हे देखिल वाचा-

डोळ्यांना पोषक भाज्या आणि फळं
Eye Care: उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ- आग होतेय? 4 उपाय, डोळ्यांना वाटेल थंड

अंड- अंड हे प्रोटीनचं एक उत्तम स्त्रोत आहे. त्याचप्रमाणे अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक उपलब्ध असतं. अंड्यातील पिवळ बलकामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे कॅरोटीनोइड्स असतात. तर अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे कॅरोटीनोइड्स असतात. यामुळे हानिकारक किरणांपासून तसचं प्रकाशापासून डोळ्याचं होणारं नुकसान टाळता येतं. तसंच डोळ्यांच्या स्नायूंचं देखील रक्षण करतात.

पालक- पालकामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन, झेक्सॅन्थिन, ल्युटीन आणि क्लोरोफिल हे सर्व घटक डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसचं पालकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि आयर्न असतं. यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. नियमितपणे पालकचं सेवन केल्यास दृष्टी चांगली होण्यास मदत होते.

हे देखिल पहा-

डोळ्यांना पोषक भाज्या आणि फळं
Eyes Care : डोळ्यांसाठी रामबाण उपाय! या सुपरफूड्सचा आहारात नक्कीच समावेश करा

पपई- पपई हे कोणत्याही ऋतूमध्ये अगदी सहज मिळणारं आणि खिशाला परवडणारं असं फळ आहे. पपईमध्ये व्हि़टॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. ज्याचा डोळ्यांना फायदा होतो. यासाठी नियमितपणे पपईचं सेवन करा.

सुर्यफूलाच्या बिया- सुर्यफूलाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अॅसिड उपलब्ध असतात. तसचं यात व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात आढळतं. या गुणधर्मांमुळे वाढत्या वय़ात कमी होण्याऱ्या दृष्टीची समस्या दूर होऊ शकते.

मटार- मटार म्हणजे हिरव्या वटाण्यामध्ये कॅरोटीनोइड्स ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे पोषक घटक असतात. यामुळे मोतीबिदूचा धोका कमी होतो. तसचं हानिकारक किरणांपासून डोळ्यांचं सरक्षण करण्यासाठी हे घटक उपयुक्त ठरतात.

जर्दाळू- जर्दाळूमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि लाइकोपीन हे पोषक तत्व आढळतात. यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते.

अशा प्रकारे तुम्ही वेळीच या पदार्थांचा तुमच्या आहारमध्ये समावेश केल्यास डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. तसचं उतारवयात डोळ्यांच्या आणि दृष्टीच्या निर्माण होणाऱ्या समस्या कमी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com