Low Blood Pressure: रक्तदाब कमी होणं घेऊ नका हलक्यात... | low bp symptoms | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

low blood pressure treatment

Low Blood Pressure: रक्तदाब कमी होणं घेऊ नका हलक्यात...

Low bp symptoms: लो बीपी म्हणजेच रक्तदाब कमी होणं या समस्येकडे अनेकजण गांभिर्याने पाहत नाहीत. मात्र रक्तदाब कमी झाल्याने Low Blood Pressure अनेक शारीरीक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. Marathi Health Tips what is Low Blood Pressure and reasons behint it

अनेकदा यातील साधारण वाटणाऱ्या समस्या Problems काहीवेळेस गंभीर ठरू शकतात. तुमचा रक्तदाब 90/60 पेक्षा कमी असेल तर तुमचा रक्तदाब Blood Pressure कमी आहे. यामध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रिडिंगची काळजी घेणं गरजेचं आहे.

अनेकदा रक्तदाब थोडाच कमी झाला असले तर त्याची फारशी लक्षणं Symptoms दिसून येत नाहीत. मात्र काही वेळेस रक्तदाब अधिक कमी होवूनही Low Blood Pressure त्याकडे दुर्लक्ष केलं गेल्यास ते धोकादायक ठरू शकतं.

रक्तदाब कमी होण्याची कारणं

हायपोवोल्मिया Hypovolemia- हायपोव्होलेमियामध्ये शरीरात द्रव्यपदार्थांची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे शरीरात योग्य प्रकारे रक्ताभिसरण न झाल्याने रक्तदाब कमी होतो. अनेकदा कमी पाणी पिणं, जास्त वेळ उपाशी राहणं तसचं उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशन होणं यामुळे अशी स्थिती निर्माण होवू शकते. यामुळे शरीरातील सोडियमची पातळी खाली घसरते ज्यामुळे बीपी कमी होवू लागते.

रक्ताची कमतरता- शरीरात रक्ताची पातळी कमी झाल्यास म्हणजेच जर तुम्हाला अॅनिमियाची समस्या असेल तर तुम्हाला रक्तदाब कमी होण्याचा त्रास होऊ शकतो. यासाठीच शरीरात रक्ताची पातळी वाढवण्यासाठी आयर्नयुक्त आहार घेणं गरजेचं आहे.

औषधं आणि बदलतं तापमान- काही औषधांच्या सेवनाने शरिरावर दुष्परिणाम होवून रक्तदाब कमी होऊ शकतो. तसचं तापमानातील चढ-उतारामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होवून रक्तदाब कमी होण्याची शक्यता वाढते.

हे देखिल वाचा-

गरोदर महिलांमध्ये रक्तदाब कमी असणं- गर्भधारणेनंतर साधारण पहिले ३ महिने महिलांमध्ये रक्तदाब कमी होण्याची समस्या दिसून येते. यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात.

शरीरातील रक्ताभिसरण, हार्मोनल बदल, व्हिटॅमिन-बी १२ आणि फॉलिक एसिडची पातळी कमी झाल्याने रक्तदाब कमी होतो. यासाठी डॉक्टर योग्य ते उपचार सुरु करतात.

रक्तदाब कमी होण्यासाठी ही काही सामान्य कारणं जबाबदार आहेत. तसचं रक्तदाब कमी झाल्यास काही लक्षणं आढळून येतात. ही लक्षण दिसून येताच योग्य ती काळजी घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राखणं शक्य आहे.

कमी रक्तदाबाची लक्षणं Low BP Symptoms

  • रक्तदाब कमी झाल्यास अचानक डोकं गरगरू लागतं आणि चक्कर येते

  • ब्लड प्रेशर लो झाल्यास जीव कासाविस होतो. काही वेळा गुदमरल्या सारखे वाटते तसचं मळमळू लागते.

  • अनेकदा रक्तदाब जास्त खाली घसरल्यास दृष्टीवर काही वेळासाठी परिणाम होवू शकतो. यामुळे अंधुक दिसू लागतं.

  • रक्तदाब कमी झाल्याचा तुमच्या त्वचेवरही परिणाम होतो. यामुळे त्वचा रुक्ष दिसू लागते.

  • काही वेळेस थकावा जाणवतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

  • अशी काही लक्षणं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसचं घरगुती प्राथमिक उपचार करावे.

टॅग्स :bloodblood pressure