Heart Blockage | वेळीच लावला हार्ट ब्लॉकेजचा शोध तर टाळता येईल हार्ट अॅटॅकचा धोका medical test for heart blockage how to avoid heart attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart Blockage

Heart Blockage : वेळीच लावला हार्ट ब्लॉकेजचा शोध तर टाळता येईल हार्ट अॅटॅकचा धोका

मुंबई : जगभरात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आजकाल खराब जीवनशैलीमुळे कुणाला बीपीची समस्या आहे, तर कुणाची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली आहे. यासोबतच अनेक लोकांमध्ये हृदयविकाराची लक्षणेही दिसून येतात.

आजकाल, खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकांना हृदयविकाराचा त्रास होत आहे. हृदयविकार योग्य वेळी आढळून आला तर त्यावर वेळीच उपचार करता येतात. अन्यथा परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते.

त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. विशेषतः हार्ट ब्लॉकेजच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हार्ट ब्लॉकेजची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. (medical test for heart blockage how to avoid heart attack )

हार्ट ब्लॉकेज शोधण्यासाठी ही चाचणी केली जाते

हार्ट ब्लॉकेज ही तुमच्या हृदयाच्या विद्युत प्रणालीची समस्या आहे. ज्यामुळे हृदयाचे ठोके नियंत्रणात राहतात. त्याला एट्रिओव्हेंट्रिक्युलर (एव्ही) ब्लॉक किंवा कंडक्शन डिसऑर्डर असेही म्हणतात.

जेव्हा हृदयात ब्लॉकेज असतात तेव्हा लक्षणे आणि चाचण्यांद्वारे त्याचा शोध घेतला जातो. जाणून घेऊया हृदयरोग तज्ज्ञांच्या मते हार्ट ब्लॉकेजची लक्षणे काय आहेत ? हार्ट ब्लॉकेज शोधण्यासाठी कोणती चाचणी आवश्यक आहे ? किंवा हार्ट ब्लॉकेजची चाचणी कशी करायची ?

ईसीजी

तुमच्या शरीरात हार्ट ब्लॉकेजची लक्षणे दिसू लागल्यास, तुम्हाला डॉक्टरांनी प्रथम ईसीजी करण्याचा सल्ला देतील. ईसीजीद्वारे हृदयात किती ब्लॉकेज आहे हे कळते. याशिवाय छातीत नेहमी दुखत असेल तर तुम्ही इतर चाचण्याही करून घेऊ शकता.

2D इकोकार्डियोग्राफी

जर ईसीजी नॉर्मल आला तर तुम्ही हार्ट ब्लॉकेज शोधण्यासाठी 2डी इकोकार्डियोग्राफी करू शकता. या चाचणीमध्ये, हृदयाच्या स्नायूंचे पंपिंग शोधले जाते. यासोबतच हृदयातील व्हॉल्व्हमध्ये काही प्रकारची गळती आहे का, याचीही तपासणी केली जाते.

2D इकोकार्डियोग्राफी चाचणीत हृदयात काही असामान्यता दिसली तर ती हृदयात अडथळे असू शकते. जर तुम्हाला छातीत दुखत असेल, थकवा येत असेल, पाठदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही ही चाचणी करून घ्यावी.

ट्रेडमिल स्ट्रेस चाचणी

ट्रेडमिल स्ट्रेस टेस्टच्या मदतीने हार्ट ब्लॉकेज देखील सहज शोधता येते. ट्रेडमिल स्ट्रेस टेस्टला एक्सरसाइज स्ट्रेस टेस्ट असेही म्हणतात. या चाचणीमध्ये, एखाद्या व्यक्तीला ट्रेडमिलवर धावावे लागते आणि डॉक्टर हृदयाची लय, रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचे निरीक्षण करतात.

यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास दिसला तर हार्ट ब्लॉकेज असू शकते. त्याच्या रिपोर्टमध्ये काही अडचण आल्यास स्ट्रेस इको डोबुटामाइन, कार्डियाक एमआरआय, सीटी कोरोनरी अँजिओग्राफी करता येते.

स्ट्रेस थॅलियम चाचणी

हृदयाच्या ज्या भागात रक्त नीट पोहोचत नाही, तिथे ब्लॉकेजची शक्यता अधिक वाढते आणि त्यानंतरच स्ट्रेस थॅलियम चाचणी केली जाते किंवा कार्डियाक एमआरआय केला जातो.

हार्ट ब्लॉकेजची ही लक्षणे आहेत

 • वारंवार थकवा जाणवणे

 • छाती दुखणे

 • जबडा दुखणे

 • छातीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला वेदना

 • वरच्या ओटीपोटात वेदना

 • उजव्या आणि डाव्या खांद्यावर वेदना

 • उजव्या आणि डाव्या हाताला वेदना

 • पाठदुखी

 • चालताना वेदना वाढणे

 • पायऱ्या चढताना श्वास लागणे

 • घाम येणे

 • छातीत धडधडणे

सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या औषधोपचारांसाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॅग्स :heart attack