Meditation Before Sleep : रात्री शांत झोप लागत नाही? असं करा मेडिटेशन, मग बघा चमत्कार l Meditation Before Sleep Benefits mental physical health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meditation Before Sleep

Meditation Before Sleep : रात्री शांत झोप लागत नाही? असं करा मेडिटेशन, मग बघा चमत्कार

Meditation Before Sleep Benefits : बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप न लागण्याची समस्या सतावत असते. वेगवेगळ्या चिंता, ताण यामुळे रात्री नीट झोप लागत नाही. त्यामुळे मग सकाळही फ्रेश होत नाही. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, निश्तेज त्वचा आणि चेहरा. रक्तदाब, मधुमेहासारखे आजार यामुळे जडतात. शिवाय निराशा, नकारात्मकता वाढू लागते. त्यामुळे जर झोपण्यापूर्वी काही खास उपाय केले तर तुमची या त्रासातून सुटका होऊ शकते.

मानसिक ताण, आजार, डिप्रेशन या सर्वांबरोबरच उत्तम शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशन करण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. मेडिटेशन करणे कधीही योग्यच असते. पण त्या बरोबरच जर रात्री झोपण्यापूर्वी फक्त १० मिनीटे जर मेडिटेशन केले तर त्याचे फार चांगले फायदे मिळतात.

चांगली झोप

बऱ्याचदा आपण शारीरिकरित्या किंवा मानसिकरित्या जास्त दमलेलो असलो की, त्यामुळेही रात्री शांत झोप लागत नाही. अशावेळी मेडिटेशन केल्याने हा शारीरिक आणि मानसिक थकवाही कमी होतो. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शांत झोप लागते.

Meditation Before Sleep

Meditation Before Sleep

स्ट्रेस कमी होतो

मेडिटेशनमुळे ताण कमी होतो. हॅप्पी हार्मोन्स शरीरात निर्माण होतात. ज्यामुळे हा ताण कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे झोपण्यापूर्वी १०-१५ मिनीट आधी मेडिटेशन नक्की करावे.

डोके दुखीत आराम

बऱ्याचदा दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे रात्री झोपण्याआधी डोके दुखी सुरू होते. रात्री झोपण्यााधी मेडिटेशन केल्याने मेंदूपर्यंत ब्लड फ्लो सुरळीत होतो आणि या डोके दुखीतून आराम मिळतो.

Meditation Before Sleep

Meditation Before Sleep

ओव्हर थिंकींग पासून वाचवतो

बऱ्याचदा रात्री रिलॅक्स झाल्यावर लोक ओव्हर थिंकींग करू लागतात. दिवसभराचे विचार डोक्यात फिरू लागतात. अशावेळी झोपण्याआधी मेडिटेशन केल्याने या विचारांना ब्रेक लागतो. आणि रात्री शांत झोप लागते.

हृदयाचे ठोके नियंत्रीत करते

मेडिटेशनमुळे श्वास संथ गतीने सुरू राहतो. श्वासाच्या वेगावर नियंत्रण आल्याने हृदयाचे ठोकेही नियंत्रीत होतात. हृदयाची गती व काम सुरळीत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.