Men Health : पुरुषांमध्ये दिसणारी ही 10 लक्षणं वाढवतात या गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध l men health men should not ignore these signs may rise risk of hormonal imbalance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Men Health

Men Health : पुरुषांमध्ये दिसणारी ही 10 लक्षणं वाढवतात या गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध

Men Health : शरीरात कोणताही अंतर्गत बदल झाला की त्याचा परिणाम बाहेर दिसू लागतो. परंतु असे काही बदल पुरुषांत घडतात ज्यांची लक्षणे बाहेर आढळून येत नाहीत. या बदलांमध्ये हार्मोनल असंतुलन याचाही समावेश आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हार्मोनल असंतुलन असते तेव्हा हार्मोन्सचा स्राव खूप किंवा खूप कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत, अगदी लहान बदल देखील संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करू शकतात.

त्यामुळे हे बदल वेळेत ओळखणे फार महत्वाचे आहे. पुरुषांमधील या समस्येबद्दल जाणून घेण्यासाठी डॉ. तुषार तायल, लीड कन्सल्टंट, इंटरनल मेडिसिन विभाग, सीके बिर्ला हॉस्पिटल (गुरुग्राम) यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया.

पुरुषांमधील हार्मोनल असंतुलनाची कारणे

थायरॉइड, कोर्टिसोल, टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन, पॅराथॉर्मोन हार्मोन्स यांसारख्या शरीरातील आवश्यक हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास हार्मोनल असंतुलन देखील होऊ शकते. याशिवाय खराब आहार, जास्त ताणतणाव, जास्त वजन किंवा कमी वजन आणि काही हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी ही प्रमुख कारणे असू शकतात. तज्ञांच्या मते, स्टिरॉइडचा गैरवापर, पिट्यूटरी ट्यूमर, आयोडीनची कमतरता किंवा अंतःस्रावी ग्रंथीला कोणत्याही प्रकारची दुखापत यामुळे देखील हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

पुरुषांमध्ये हार्मोनल असंतुलन असल्यास दिसतात ही लक्षणं

 • जास्त वजन वाढणे किंवा कमी होणे

 • खूप थकवा

 • स्नायू किंवा सांधेदुखी

 • भरपूर घाम येणे

 • थंड किंवा उष्णता वाढणे

 • दिवसातून अनेक वेळा बद्धकोष्ठता किंवा आतड्याची हालचाल होणे

 • वारंवार मूत्रविसर्जन

 • वाढलेली तहान आणि भूक

 • बहुतेक वेळा नैराश्य, किंवा चिंता जाणवणे

 • केस पातळ होणे, दाढीची वाढ कमी होणे आणि शरीराचे केस वाढणे

 • कोरडी त्वचा आणि पुरळ

पुरुषांमधील हार्मोनल असंतुलनावर उपचार

वैद्यकीय तपासणीनंतरच हार्मोनल असंतुलनाची समस्या ओळखली जाऊ शकते. यासाठी आवश्यक रक्त तपासणी, एमआरआय आणि अल्ट्रासाऊंड आवश्यक आहे. पण तुमच्या जीवनशैलीत काही आवश्यक बदल करूनही ही समस्या नियंत्रित केली जाऊ शकते. (Men)

कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसह दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करणे खूप प्रभावी ठरू शकते.

तुमच्या आहारात कार्ब्स, प्रथिने आणि निरोगी चरबीचे प्रमाण वाढवणे.

या समस्येमध्ये, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे खूप महत्वाचे आहे.

अधिक सेंद्रिय अन्न उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करा.

अन्न गरम करण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरू नका

या उपायांनी या समस्येवर मात करता येऊ शकते. (Male Infertility)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर अवलंबून असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.