
Mind Strength Habits : तुम्हालाही लवकर डिप्रेशन, स्ट्रेस येतो का? या टिप्स खास तुमच्याचसाठी
Mind Strength Habits : आपले रोजचे जीवन फार धावपळीचं आणि धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे रोजच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस येतो, भीती वाढते, राग येता, अपेक्षा भंग होऊन निराशा येते. रोज आयुष्य सारखंच राहत नाही. चढ-उतार हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. बरेच लोक समोर येणाऱ्या अडचणींनी घाबरून जातात आणि ताण घेतात. लवकर निराशही होतात. पण अशा लोकांना मानसिकदृष्ट्या स्ट्राँग होण्याची आवश्यकता आहे. अशा लोकांनी मन कसे स्ट्राँग करावे यासाठीच्या काही टिप्स देत आहोत. मेटली स्ट्राँग लोकांच्या काही सवयी असातात, ज्या इतरांनी शिकून घेणं फार गरजेचं असतं.
या असतात मेंटली स्ट्राँग लोकांच्या सवयी
विनाकारण अती विचार करत नाहीत
एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देत असते तेव्हा तुम्ही त्यावर सारखा विचार करत असतात. पण नुसता विचार केल्याने त्यातून फक्त वेळ वाया जात असेल तर ते बंद करा. नाहीतर विचार करून त्या गोष्टीच्या मूळापर्यंत पोहचा आणि मूळावर घाव घालून समस्या सोडवा आणि विचार बंद करा.
इतरांच्या कमतरतांनी नाराज होत नाही
बरेच लोकांना बऱ्याच वाइट सवयी असतात. पण जे लोक मनाने स्ट्राँग असतात ते इतरांच्या वागण्याने आपले संतुलन ढळू देत नाही. दुसऱ्याच्या कमतरतांपेक्षा स्वतःच्या क्षमतांकडे जास्त लक्ष देतात.
इच्छाशक्ती स्ट्राँग करतात
नकारात्मक गोष्टी लवकर हावी होतात, वाईट गोष्टी लवकर शिकतात पण तेच सकारात्मक, चांगल्या गोष्टी शिकायला कष्ट पडतात. त्यामुळे लोकांच्या मनात द्वंद असतात. पण हे लोक निश्चय पक्का ठेवतात. डळमळीत होत नाहीत.
मित्रही विचारपुर्वक निवडतात
जे लोक मनाने स्ट्राँग असतात ते सहसा आपली मानसिक शांती भंग होऊ देत नाहीत, त्यामुळे अशा लोकांसोबत मैत्रीही करत नाही. त्यामुळे हे लोक आपले मित्र फर विचारपुर्वक निवडातात.
हे लोक उदार असतात
कंजूसपणा भीतीतून जन्मतो. पण जे लोक मानसिकदृष्ट्या स्ट्राँग असतात ते आपल्याला कशाची कमी पडेल अशा भीतीत न वावरता भविष्याची तरतूद करून ठेवतात आणि मनात उदारता बाळगतात.
स्वतःच्या शरीराची काळजी घेतात
तुमच्या शारीरिक आरोग्याचं मनावर आणि मनाचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे हे लोक आपल्या मनाबरोबर शरीराचीपण काळजी घेतात.
कोणाविषयी मनात द्वेष ठेवत नाही
मानसिकरित्या मजबूत राहण्यासाठी कोणाविषयी राग, द्वेष मनात धरून ठेवणं मनासाठी पोषक नसतं. त्यापेक्षा क्षमा करून पुढे जाणारे जास्त मजबूत असतात.