छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळणार; आठ दिवसांची मुदत

पर्वतीमध्ये २३ हजारांहून अधिक मतदार छायाचित्राविना
छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळणार; आठ दिवसांची मुदत

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या २३ हजार ६४५ इतकी आहे. या मतदारांनी येत्या आठ दिवसांत छायाचित्र जमा न केल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.

पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार मतदारयादीमध्ये नवीन मतदारांची नोंदणी करणे, मृत, स्थलांतरित दुबार मतदारांची नावे वगळणे, छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र यादीमध्ये समाविष्ट करणे, तसेच इतर दुरुस्तीचे कामकाज सुरु आहे.

छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळणार; आठ दिवसांची मुदत
महामेट्रोत नोकरीची संधी;13 जुलैपर्यंत पाठवू शकता अर्ज

पर्वती विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव आहे, परंतु छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या २३ हजार ६४५ आहे. अशा मतदारांनी आठ दिवसांमध्ये त्यांचे छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा पर्वती विधानसभा मतदार संघ, दुसरा मजला, सारस बागेजवळ मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. पुढील आठ दिवसांत छायाचित्र जमा न करणाऱ्या मतदारांची नावे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वगळण्यात येतील.

छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात पडताळणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.nic.in/pune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी पाटील यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com