NeoCoV : कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिअंट, वुहानच्या वैज्ञानिकांनी दिला इशारा

Corona NeoCoV
Corona NeoCoV Google

कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिअंट नियोकोव आला, वुहानच्या वैज्ञानिकांने दिला इशारा

जगभरामध्ये कोरोना व्हायरसच्या ओमीक्रॉन व्हेरिअंट केस कमी होत असताना पुन्हा आता एका नव्या व्हेरिअंटने चिंता वाढवली आहे. कोविड या नियोकोव (NeoCov) व्हेरिअंट धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. चीनमधील वुहान वैज्ञानिकांनी चिंता व्यक्ती केली आहे की, कोविडचा नियोकोव व्हेरिअंट पूर्वीच्या सर्व व्हेरिअंटपेक्षा अधित घातक असू शकतो. पण आतापर्यंत हा व्हेरिअंट माणसांमध्ये परसरला नाही पण वैज्ञानिकांच्या मते, जर हा व्हायरस आणखी उत्परिवर्तित (म्युटेट) झाला तर भविष्यामध्ये माणसांसाठी घातक ठरू शकतो. वैज्ञानिकांने सांगितले की, आधी कोरोना संर्सग झालेले किंवा कोराना प्रतिंबधक लस घेतल्यानंतरही लोक नियोकोव आणि PDF-2180-CoVने संक्रमित होऊ शकतो.

वैज्ञानिकांने आणखी काय सांगितले?

वुहानच्या वैज्ञानिकांनी एक रिसर्च पेपरनुसार, नियोकोव मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम या MERS-कोरोना व्हायरस संबधित आहे. पेपर ला बायोरेक्सिव वेबसाईटवर प्रकाशित केला आहे आणि आतापर्यंत त्याची पुनरवलोकन केलेले नाही. दक्षिन अफ्रिकेतील एका वटवाघळामध्ये आढळेलला व्हायरस फक्त जनावरांमध्ये पसरण्यासाठी ओळखला जात होता पण तथापि, आता असे आढळून आले आहे की, निओकोव्ह आणि PDF-2180-CoV एंट्रीसाठी BAT ACE2 आणि Human ACE2 यासह काही प्रकारचे angiotensin-रूपांतर करणारे एन्झाइम वापरते.

त्याची लक्षणे काय आहेत?

जरी एक नवीन व्हेरिअंट नाही. MERS-CoV विषाणू ताप, खोकला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होणे, यासारख्या लक्षणांच्या बाबतीत SARS-CoV-2 सारखाच आहे. 2012 ते 2015 दरम्यान मध्य पूर्व देशांमध्ये पसरला. या संसर्गामुळे अनेक लोक मरण पावले.

मृत्यू आणि ट्रान्समिशन दर दोन्ही उच्च

रिसर्च में निष्कर्षानुसार आधारावर आहे कि MERS-CoV Beta-CoV (मर्बकेवायरस) वंश C संबंधित आहे, जो जवळजवळ 35 टक्के उच्च मृत्यु दर पाहता एक मोठा धोका बनला आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, स्टडीमधून समोर आले आहे की MERSसंबंधित व्हायरसमध्ये ACE2 वापरण्यासाठी प्रथम प्रकरण प्रदर्शित केले जाते. त्याचा मृत्यू दर आणि ट्रान्समिशन दर दोन्ही उच्च आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, विषाणूची उत्पत्ती कशी झाली हे पूर्णपणे स्पष्ट नाही, परंतु विषाणूच्या जीनोम विश्लेषणानंतर असे मानले जाते की ते वटवाघळांमध्ये उद्भवले आणि नंतर उंटांमध्ये पसरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com