H3N2 Diet : आता परत नवीन आजार नको... H3N2 पासून वाचण्यासाठी असे करा डायट

कोरोनानंतर देशात H3N2 हा इन्फ्लूएंझा विषाणू वेगाने पसरतो आहे.
H3N2 Diet Prevention Tips
H3N2 Diet Prevention Tipsesakal

H3N2 Prevention Tips: कोरोना महामारीनंतर आता इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 ने आपली चिंता वाढवली आहे. कोरोनानंतर देशात H3N2 हा इन्फ्लूएंझा विषाणू वेगाने पसरतो आहे.

त्याची लक्षणे देखील फ्लूच्या विषाणूंसारखी आहेत ज्यात ताप आणि खोकला कोरोनासारखा आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून सल्लाही जाहीर करण्यात आला आहे.

सरकारने जाहीर केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये लहान मुले आणि वृद्धांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला असून, कोविडच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इन्फ्लूएंझा व्हायरस नाक, डोळे आणि तोंडातून पसरतो.

हवामानातील सततच्या बदलामुळे हा व्हायरस पसरण्याचा धोका खूप वाढला आहे. हा विषाणू टाळण्यासाठी, प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून शरीराला फ्लूपासून वाचवता येईल. अशात आपल्या आहारात या गोष्टी समाविष्ट केल्याने तुम्ही या आजारापासून वाचवू शकता.

H3N2 Diet Prevention Tips
H3N2 Flu : मास्क वापरा, गर्दी टाळा; सिझनल फ्लूबाबत महापालिकेचे नागरिकांना आवाहन

१. दालचिनी : दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. शिवाय यात अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि शरीराला धोकादायक मॉलिक्यूल्स आणि फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास खूप मदत करते. हे शरीरातील कोणत्याही विषाणूची वाढ थांबवण्याचे काम करते.

२. मेथी दाणे : अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की मेथीच्या दाण्यांमध्ये सॅपोनिन्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्स सारखी संयुगे असल्याने याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. याने पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादनही वाढते, जे संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

H3N2 Diet Prevention Tips
H3N2 Flu : एच३एन२बाबत सतर्कतेचे आदेश; हे आहे प्रतिबंधात्मक उपाय...

३. आले : आल्याने खोकला आणि घसा दुखी कमी होते हे तर आपल्याला माहितीच आहे. आल्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करु शकतात. आल्यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत, जे अनेक व्हायरस आणि बॅक्टेरियाची वाढ आणि प्रसार रोखण्यास मदत करू शकतात.

४. हळद : खरतर हळदीविषयी आणि तिच्या गुणधर्मांबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. शतकानुशतके आपण हळदीला औषध म्हणून वापरतो. यात कर्क्यूमिन नावाचे एक संयुग असते ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

H3N2 Diet Prevention Tips
Pune News: पुणेकरांच्या चिंतेत वाढ! जानेवारीपासून पुण्यात आढळले H3N2 विषाणूचे 162 रुग्ण; एकाचा मृत्यू

५. लवंग : लवंगात अशी अनेक संयुगे आढळतात जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात, जसे की युजेनॉल. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यासोबतच यामध्ये अँटीवायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे ते बॅक्टेरिया किंवा व्हायरसला वाढण्यापासून रोखते.

Disclaimer : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com