Oil Using Tips : आहारात कोणते तेल असावे? बदलत्या ऋतुनूसार करावा आहारात तेलाचा वापर l oil using tips we should use oil in diet by changing season expert says know oil using tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oil Using Tips

Oil Using Tips : आहारात कोणते तेल असावे? बदलत्या ऋतुनूसार करावा आहारात तेलाचा वापर

Oil Using Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह अशा आजार मनुष्याला जडले आहे. त्यात आहारात ‘तेल’ खाणे म्हणजे या आजारांना निमंत्रण देणे आहे, अशी धारणा समाजात होऊन बसली आहे. आयुष्यात ‘फीट’ आणि ‘फाईन’ राहण्यासाठी आपले फॅमिली डॉक्टरही आहारात तेलाची मात्रा कमी करा, सल्ला देतात. तर दुसरीकडे हृदयरोगापासून तर अनेक आजारांवर हेच तेल वापरा अशा जाहिरातीचा भडिमार होताना दिसतो. तेव्हा आरोग्यासाठी नेमके कोणते तेल फायद्याचे याचा संभ्रम मनात निर्माण होतो.

आहारात शरीरासाठी चांगले तेल कोणते ही शंकाच मनात घर करून राहात असताना आहार तज्ज्ञांनी मात्र बदलत्या ऋतुनूसार आहारात तेल वापरा असा सल्ला दिला आहे. आहारात तेलाचा वापर कमी केला तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, हे सांगताना अतिप्रमाणात तेलाचे सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक असतो.

बाजारातील प्रत्येक तेल हे कोलेस्ट्रॉल मुक्त असल्याचा दावा केला जातो, मात्र यामध्ये किती सत्य याबाबत सामान्य नागरिक अनभिज्ञ असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी तेलाचे प्रमाण नेहमी कमी ठेवावे लागते तसेच ज्या तेलामध्ये ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅट’, ‘ओमेगा थ्री’ आणि ‘कॅरोटिन’ असते असे तेल आहारात असावे असे असे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. राहुल राऊत म्हणाले.

या गोष्टी लक्षात ठेवा

तळण्यासाठी एकदा वापरलेले तेल परत वापरू नये.

आहारात कमी तेलाचा वापर हिताचा ठरतो

आहारात ऑलिव्ह आणि शेंगदाणा तेल वापरणे उत्तम

पॅकबंद तेलापेक्षा कच्च्या घाणीचे तेल वापरावे.

तेल तूपही आरोग्यदायी

तूप - पचनासाठी चांगले, स्मरणशक्ती सुधारते, हाडांची ताकद वाढवते

मोहरीचे तेल - पचन आणि रक्ताभिसरणासाठी चांगले, जंतू, विषाणूंविरूद्ध लढण्यास मदत करते, त्वचेसाठी उत्तम (Health)

खोबरेल तेल - रक्तातील कोलेस्टेरॉल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते

ऑलिव्ह तेल - भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. सांधेदुखी कमी करण्यासाठी, पार्किन्सन आणि अल्झायमरचा धोका दूर करण्यासाठी वापर

सूर्यफूल तेल - व्हिटॅमिन ई मिळते, हृदयविकाराचा धोका कमी करते, यातील कोलन कॅन्सरपासून बचाव करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते