Over Eating : तुम्ही सतत काही तरी खात असता काय? वारंवार भूक का लागते? ही असू शकतात कारणं l over eating side effect why people more hungry know the reason can be reason of big disease | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Over Eating

Over Eating : तुम्ही सतत काही तरी खात असता काय? वारंवार भूक का लागते? ही असू शकतात कारणं

Over Eating : अन्न हा प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असतो. काही लोकांची भूक फार संयमी असते, तर काही लोकांना सतत काही तरी खात राहाण्याची सवय असते. तर काही लोक कॅलरीज मोजून खाणंही पसंत करतात. मात्र यात काही लोक हे असे असतात ज्यांना सतत काहीना काही खात राहाण्याची सवय असते.

काही लोक इतके खातात की किती दिवसभरात आपण किती खातोय याचं भानही त्यांना नसतं. मात्र यामागे नेमके काय लॉजिक दडलेले असते. त्याबाबत आज आपण जाणून घेऊया. जास्त खाण्याचे काही धोके आहेत का याबाबतही आपण सविस्तर जाणून घेऊया.

जास्त भूक लागण्याचं काय कारण आहे?

पोषक तत्वांची कमतरता

बर्‍याच वेळा जेव्हा एखाद्याला चीज, चॉकलेट, सर्व काही खावेसे वाटते, तेव्हा हे जाणून घेणे आवश्यक आहे की शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे असे होत आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या घटकांच्या कमतरतेमुळे वारंवार भूक लागण्याची लागते.

हार्मोनल असंतुलन असणे

शरीरात हार्मोन्सचे असंतुलन असले तरी भूक वाढू शकते. या दरम्यान, हार्मोन्स असे एन्झाइम सोडू शकतात, ज्यामुळे भूक वाढते. यामध्ये घ्रेलिन हार्मोन सामान्य आहे. जास्त खाल्ल्याने लठ्ठपणासह इतर समस्या उद्भवू शकतो. यामुळे इतर शारीरिक समस्यांतही वाढ होते. (Health)

तणावात असणे

तुम्ही तणावात असाल तरीही तुमची भूक वाढू शकते. या दरम्यान कार्टिसोलची पातळी वाढते. त्यामुळे भूक वाढण्यास मदत होते. यामध्ये व्यक्ती जास्त कॅलरी वाज फूड खाऊ लागतो. भूक वाढली की, माणूस जे मिळेल ते खाऊ लागतो. यामुळे ते फॅटी आणि जास्त कॅलरी असलेले अन्न खाण्यास सुरुवात करतात. अशा प्रकारची सवय असेल तर ती टाळली पाहिजे. (Food)

जास्त मद्यपान

भूक वाढवण्यामागे दारू पिणे हा देखील एक मोठा घटक आहे. जे लोक खूप कमी दारू पितात. त्यांच्या भूक लागण्याच्या क्षमतेत फारसा काही फरक पडत नाही. मात्र जे लोक जास्त दारू पितात. त्यांना जास्त भूक लागते. त्यांना खारट पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा पेयानंतर फॅटी स्नॅक्स खायला आवडतात. असे लोक लवकरच लठ्ठपणाला बळी पडतात.