
Poha Side Effects : नाश्त्याला रोज पोहे खाताय? तुम्हाला होऊ शकतात हे ३ गंभीर आजार
Poha Side effects : बहुतेक सगळ्याच घरांमध्ये नाश्त्याला पोहे बनवले जातात. शिवाय जे लोक घरापासून लांब राहतात, त्यांनाही बाहेर नाश्त्याला गेल्यावर सहज, पटकन आणि परडवणाऱ्या दरात मिळणारी डीश म्हणजे पोहे असतात. पण जर तुम्ही रोज पोहे खात असाल तर आताच सावध व्हा. याचे साइड इफेक्ट्सही जाणून घ्या. पोह्यात असेललं फायबर सहज पचत नाही, शिवाय ते फार पाणी शोषतं त्यामुळे असे पोहे खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
रोज पोहे खाल्ल्याने असं होतं नुकसान
ब्लड शुगर - रोज पोहे खाल्ल्याने तुमची ब्लड शुगर वाढू शकते. पोहे तांदळापासून बनवले जातात. त्यामुळे रक्तातली साखर वाढू शकते. यामुळे शरीरातली साखर असंतुलीत होते. त्यामुळे डायबेटीस असणाऱ्यांनी रोज पोहे खाणं धोकादायक ठरू शकतं.
अॅसिडिटी - पोह्यांमुळे अॅसिडिटी होऊ शकते. पोह्यांमध्ये फायबर जास्त असल्याने ते पचायला फार वेळ लागतो. त्यामुळे पित्त वाढू शकतं, अपचन होऊ शकतं.
पोट बिघडणे - यामुळे पोट खराब होऊ शकतं. कारण यामुळे तुमची बॉवेल मुव्हमेंट फास्ट होते. रोज पोहे खाल्ल्याने मेटाबोलीक प्रक्रिया ओव्हरअॅक्टिव्ह होते. यामुळे पोट खराब होतं. दिवसातून २-३ वेळा टॉयलेटला जाण्याची वेळ येऊ शकते.
त्यामुळे आठवड्यातून जास्तीत जास्त ३ दिवस पोहे खाऊ शकतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.