
संशोधकांचा दावा : हे फळ खाणाऱ्या पुरुषांना लैंगिक समस्या जाणवत नाहीत
मुंबई : डाळींब खाणे हा पुरुषांच्या low testosterone, libido, irectile disfunction या आजारांवरील उपाय ठरू शकतो. हे फळ खाल्ल्याने पुरूष आणि महिला दोघांचेही लैंगिक जीवन सुकर होऊ शकते. स्कॉटलंडमधील एडिनबर्गच्या क्वीन मार्गारेट विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनातू हा निष्कर्ष समोर आला आहे.
डाळींब खाल्ल्याने टेस्टोस्टेरोनचे प्रमाण वाढते. लैंगिक क्रिया आणि मन:स्थिती सुधारते व शुक्राणूंचा दर्जा वाढतो. डाळिंबामध्ये रेड वाईन आणि ग्रीन टीपेक्षाही तिप्पट अॅण्टिऑक्सिडंट असल्याचे सांगितले जाते. अॅण्टिऑक्सिडंट रक्ताभिसरण सुधारतात, सूज कमी करतात आणि हृदय रोगाची जोखीम कमी करतात.
हेही वाचा: सोयाबीनमुळे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर होतो परिणाम? दाव्यावरून वाद
टेस्टोस्टेरोन
टेस्टोस्टेरोन हे पुरुषांमधील हार्मोन आहे. यामुळे चेहऱ्यावरील केस, घोगरा आवाज, स्नायूंची वाढ, लैंगिक आयुष्य नियंत्रित होते. स्कॉटलंडच्या एका विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार ज्या पुरुषांना दोन आठवडे डाळिंबाचा रस देण्यात आला त्यांच्यात टेस्टोस्टेरोनची २४ टक्के वाढ झाली.
नपुंसकता
डाळींब हे इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुंसकतेवरही उपयुक्त आहे. नपुंसकतेसाठी कारणीभूत ठरणारी मनोवस्था सुधारण्यासाठी डाळींब मदत करते.
रक्ताभिसरण
शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रमाणे लिंगामध्येही रक्ताभिसरण चांगले होणे आवश्यक असते. डाळिंबाचा रस प्यायल्यास त्यातील अॅण्टिऑक्सिडंट गुणांमुळे रक्ताभिसरण चांगले होते.
लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे रेक्टाइल डिसफंक्शन, लो टेस्टोस्टेरोन, हार्मोन लेवल कमी होणे अशा समस्या उद्भवतात. डाळिंबामुळे लठ्ठपणा कमी होतो. २०१६ साली झालेल्या एका अभ्यासानुसार जे लोक रोज डाळींब खातात त्यांची भूक शांत राहाते.
Web Title: Pomegranate Will Solve Sex Problems Of Men
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..