Ramzan Ramadan 2023 : रोजा ठेवल्यावर दिवसभरात ब्रश केल्याने रोजा मोडतो का l Ramzan Ramadan 2023 Brushing During Ramadan misunderstandings | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramzan Ramadan 2023

Ramzan Ramadan 2023 : रोजा ठेवल्यावर दिवसभरात ब्रश केल्याने रोजा मोडतो का?

Brushing During Ramadan : चंद्र दिसताच रमजानच्या पवित्र महिन्याची सुरुवात झाली आहे. रमजानमध्ये रोजे करणारे ३० दिवस उपवास करून अल्लाहची इबादत करतात. हा महिना खाणं, झोपणं आणि प्रार्थना करण्याशी निगडीत आहे. पण आजही अनेक लोकांच्या मनात रोजाविषयी काही प्रश्न आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रोजा ठेवलेला असताना दात ब्रश करावे का?

रोजे ठेवणारे लोक इफ्तारपर्यंत निर्जला उपवास करतात. दिवसभर पाणी न प्यायल्याने तोंडाला दुर्गंधी येते. जर तुम्ही ही ओरल केअर काँशियस असाल तर जाणून घेऊया याचं उत्तर.

रोजा असाताना ब्रश केल्याने मोडतो का रोजा?

इस्लामचे बहुतेक जाणकार लोक याचं नकारार्थी उत्तर देतात. ब्रश केल्याने रोजा मोडत नाही. जर रोजेदार ब्रश करताना पूर्ण काळजी घेत पेस्ट, माउथवॉश, पाणी गिळत नसेल, नीट थुकत असेल तर रोजा असतानाही ब्रश करता येऊ शकतो.

कडुलिंबाच्या काडीचा करावा वापर

जगभरात हजारो वर्षांपासूम दातांच्या स्वच्छतेसाठी कडुलिंबाच्या काडीचा दातून म्हणून वापर केला जातो. बऱ्याच वैज्ञानिक शोधात हे सिद्ध झालं आहे की, कडुलिंबाच्या दातूनने अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटीप्लाक गुण असतात. ज्यामुळे दात टूथपेस्टपेक्षाही स्वच्छ होतात.

सेहरीनंतर लगेच स्वच्छ ब्रश करावा

रात्री सेहरी खाण्यानंतर दात नक्की साफ करा. काही खाल्ल्यानंतर किंवा झोपेतून उठल्यानंतर तोंडाला दूर्गंधी येते. अशात या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी दात स्वच्छ करणं फार आवश्यक आहे. त्यामुळे सेहरी नंतर लगेच दात घासणे आवश्यक असते.