Weight Loss: खरंच गरम पाणी पिल्याने वजन कमी होतंय? वाचा सविस्तर

वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे आपल्यासाठी योग्य आहे का?
weight loss
weight losssakal

प्रत्येकजणाला आपलं वजन कमी करावसं वाटतं. मग वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. कोणी खाने पिणे सोडून देतात तर कुणी डाईट करतात. यात हल्ली बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी वर्क आउट करणे आणि जिम ला जाणे अगदी साधारण झाले. परंतू वजन कमी करण्यासाठी एक उपाय खुप प्रचलित आहे. तो म्हणजे गरम पानी पिणे

सहसा महिला वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. पण खरंच ही ट्रीक आपल्यासाठी उत्तम आहे का? चला तर जाणून घेऊया. (really drinking warm water makes weight loss read story)

weight loss
Weight Loss Tips: ‘या’ पध्दतीने पांढरा भात खाऊन देखील तुमचे वजन कमी होऊ शकते

गरम पानी पिण्याचे फायदे

पाणी पिणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. गरम पाणी आपल्या शरीराला डिटॉक्स करत विषारी पदार्थांना शरीराच्या बाहेक काढतात. यामुळे हेल्थशी निगडीत खुप साऱ्या दुर होतात. गरम पाणी पिल्याने मेटाबॉलिज्म वाढते आणि यामुळे भूखपण कमी लागते. जर तुम्ही जेवण झाल्यानंतर गरम पानी पित असाल तर यामुळे तुमची पचनक्रियानिगडीत समस्याही दुर होते. एवढचं काय तर अॅसिडिटीसारख्या समस्याही दुर होतात.

weight loss
Warm Water : हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे 6 मोठे फायदे जाणून घ्या

गरम पाणी केव्हा प्यावे?

गरम पानी खाली पोटी किंवा जेवल्यानंतर गरम पाणी पिल्याने वजन घटण्यास मदत होते. जर तुम्ही रोज सकाळी गरम पाणी प्यावे. यामुळे फॅट बर्न होते. एवढंच काय तर जेवल्यानंतर गरम पाणी पिणे पचनक्रियेसाठी उत्तम आहे आणि फॅट कंट्रोलमध्ये पण राहते. जर गरम पाणी रोज खाली पोटी पिले तर बेली फॅट कमी होण्यास मदत होते.

weight loss
Water Crisis : गंगापूर रोड भागात पाणीटंचाईने नागरिक हैरान

गरम पाणी पिण्याचे नुकसान?

गरम पाणी वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे. परंतू गरम पाणी पिल्याने बॉडीला नुकसानही होऊ शकते.

1. अति प्रमाणात गरम पाणी पिल्याने नसांमध्ये सूजन निर्माण होते. यामुळे अनेकदा ब्रेनची नसांवरही प्रभाव पडू शकतो. त्यामुळे डोकेदुखी वाढते.

2. गरम पानी पिल्याने बॉडी डिटॉक्स पण होतात पण सोबतच गरजेपेक्षा जास्त गरम पानी पिल्याने किडनीवरही जोर पडतो. आणि किडनी डॅमेज होण्याची शक्यता असते.

या पाण्याने ब्लड वेसेल्समध्ये रक्ताचा फ्लो जास्त होतो. ज्यामुळे अनेक शारीरीक समस्या निर्माण होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com