Human Survive Without Kidneys : खरंच दोन किडनीशिवायही जिवंत राहू शकतो माणूस? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Human Survive Without Kidneys

Human Survive Without Kidneys : खरंच दोन किडनीशिवायही जिवंत राहू शकतो माणूस?

Human Survive Without Kidneys : बिहारच्या मुजफ्फरपुर मध्ये एक असं प्रकरण उघडकीस आलंय की जिथे एका डॉक्टरने महिला रुग्णाच्या दोन्ही किडन्या काढल्या आणि फरार झाला. सुनीता बिना नावाची ही रुग्ण किडनी शिवाय मागील चार महिन्यापासून जगत आहे. मात्र दर दोन दिवसानंतर सुनीताची डायलिसिस केली जात आहे ज्यामुळे ती जिवंत आहे.

या प्रकरणावरुन एका गोष्टीबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केला जात आहे की खरंच माणून दोन्ही किडनी शिवाय जिवंत राहू शकतो का? जर हो, तर किती दिवस? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (Really Human Can Survive Without Kidneys for long time)

जगात असे अनेक लोक आहे जे एका किडनीवर जिवंत आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका किडनी हेल्थ ऑर्गेनायजेशननुसार प्रत्येक 750 व्यक्तींपैकी एक व्यक्ती एका किडनीवर जन्माला येतो. अनेकदा आजापपणामुळे माणसाची एक किडनी काढली जाते.  अशात व्यक्तिची एक किडनी ब्लड स्वच्छ करण्याचे काम करते मात्र ज्या व्यक्तीजवळ एकही किडनी नाही त्या व्यक्तीला कोणत्याही ट्रिटमेंटशिवाय जिवंत राहणे अशक्य आहे.

किडनी ब्लड स्वच्छ करण्याचं काम करते. जर हे काम बंद झाले तर आपल्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. जर कोणत्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या काढण्यात आल्या तर तो डायलिसिस शिवाय जिवंत राहू शकत नाही. आठवड्यातून त्याला तिनदा डायलिसिस करणे गरजेचे असते.

किडनीशिवाय डायलिसिसवर व्यक्ती जिवंत राहू शकतो. डायलिसिसवर व्यक्ती वर्षानुवर्षे जिवंत राहू शकतो. यासाठी त्याला दर दोन दिवसानंतर डायलिसिसची गरज पडते. असे अनेक लोक आहे जे डायलिसिसमुळे जिवंत आहे.

किडनी ट्रांसप्लांट करताना कोणती काळजी घ्यावी?

किडनी ट्रांसप्लांटसाठी डोनर आणि रुग्णासाठी ब्लड ग्रुप मॅच होणे गरजेचे आहे. यानंतर डोनर आणि रुग्णाचे टिश्यू मॅच केले जातात. जर टिश्यू मॅच झाले तरच किडनी ट्रांसप्लांट केली जाते. कधी कधी किडनी ट्रांसप्लांटनंतर शरीर किडनी रिजेक्ट पण करू शकतो त्यामुळे यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

सुरवातीचे काही दिवस खूप नाजूक असतात. एक वर्षानंतर किडनी ट्रांसप्लांट यशस्वी मानले जाते. जर व्यक्तीचं किडनी ट्रांसप्लांट झालं असेल तर त्याने लाईफस्टाईल बदलायला हवी. धूम्रपान करणे सोडायला हवे. एवढंच काय तर वजन कमी करावे आणि उत्तम डाएट घ्यावा.