Office Tiredness : ऑफिसमध्ये काम करून करून थकवा येतो? या ट्रिकने परत मिळवा गेलेली एनर्जी

ऑफिसमध्ये असं सतत लो फिल होणे आरोग्यासाठी चांगले नव्हे. यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Office Tiredness
Office Tirednessesakal

Office Tiredness : ऑफिसमध्ये काम करून करून थकवा येणे फार सामान्य आहे. अनेकांना सततच्या कामामुळे अंगदुखी आणि कंटाळवाणे वाटते. अशा परिस्थितीत सामान्यपणे विथ एनर्जी काम करणे अशक्य आहे. मात्र ऑफिसमध्ये असं सतत लो फिल होणे आरोग्यासाठी चांगले नव्हे. यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तेव्हा तुम्ही असे काहीतरी काम करा ज्याने तुमची एनर्जी लेव्हल वाढेल. चला तर हे करण्याची सोपी ट्रिक आद आपण जाणून घेऊया.

थकवा दूर करण्यासाठी रोज सकाळी करा हे काम

तुम्हाला दिवसभर थकवा येऊ नये, सुस्ती येऊ नये असे वाटत असेल तर तर तुम्हाला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या लाइफस्टाइलमध्ये हे बदल करावे लागतील. चला जाणून घेऊया सविस्तर.

१. मॉर्निंग वॉक

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी वॉशरूमध्ये जा आणि फ्रेश व्हा नंतर लगेच मॉर्निंग वॉकसाठी निघा. त्यानंतर तुम्ही ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मॉर्निंग वॉक करू शकता. त्यामुळे तुम्हाला एनर्जेटिक फिल होईल.

मॉर्निंग वॉक करण्याचे फायदे

जर तुम्ही सकाळी 15 मिनिटे मॉर्निंग वॉक केले तर तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील कारण एस्ट्रोजेन आणि डोपामाइन सारख्या हॅप्पिनेस हार्मोन्सची पातळी वाढू लागेल आणि तुम्हाला टेन्शन देणारे कॉर्टिसोल हार्मोन्सची पातळी कमी होईल. यामुळे, तुम्ही तणावापासून दूर राहाल, आणि तुम्हाला ऑफिस टायमिंगमध्ये थकवा येणार नाही. (Lifestyle)

सकाळी लवकर चालण्याने तुमच्या स्नायूंना आणि हाडांना खूप ताकद मिळते, ज्यामुळे थकवा आणि शरीर दुखण्याची समस्या कमी होते.

मॉर्निंग वॉकचा थेट संबंध चांगल्या झोपेशी असतो. जर तुम्ही रात्री शांतपणे झोपलात तर दिवसभरात थकवा जाणवणार नाही.

Office Tiredness
Healthy Lifestyle Habits: तुम्हाला, कायमचे निरोगी राहायचंय का? मग, दररोज पाळा सुदृढ आरोग्याची ‘ही’ पंचसूत्री

2. पायऱ्या चढणे

आजकाल शहरांमध्ये लहान मोठ्या बहुमजली इमारतींमध्ये लिफ्टचा वापर खूप आहे, ते सोयीचे असल्याने पायऱ्या चढण्याचे कष्ट कोणी घेत नाही, आणि त्यामुळे लोक आळशी झाली आहेत. पण तुम्ही सकाळी उठल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटे पायऱ्या चढून उतरल्यास तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण वाढू लागते. पाणी पिल्याशिवाय हे काम करू नका. (Health)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com