
Salt Side Effect : तुम्हीही वरून मीठ घेता काय? वेळीच थांबा, दुष्परिणाम वाचून बसेल धक्का
Salt Side Effect : अन्नाची चव वाढवणारा जेवणातील महत्वपूर्ण पदार्थ म्हणजे मीठ. ते नसेल तर अन्न बेचव लागतं. कधी कधी जेवणात मीठ कमी झाले असेल तर बरेच लोक वरून मीठ घेतात. बरेचदा आई मुलांना सांगत असते की वरून मीठ घेऊ नकोस नाहीतर रक्ताचं पाणी होईल. त्यामागे काय कारण होतं बरं?
मीठाने जेवणाची चव वाढते यात काही वादच नाही. मात्र ते योग्य प्रमाणातच असायला हवं. मीठ अतिप्रमाणात आणि जेवणात वरून खाल्ल्यास त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
जेवणात वरून मीठ घेतल्यास भोगावे लागतील हे दुष्परिणाम
रक्तदाब वाढण्याचा धोका
जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) धोका निर्माण होतो. रक्तदाबामुळे (High BP) अनेक आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दृष्टी कमी होऊ शकते, हृदयवरील ताण वाढतो त्यामुळे हृदयविराकाराच झटका येण्याची भीती उद्भवते.
लठ्ठपणा वाढू शकतो
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण जेवणात जास्त मीठ खाल्ल्यामुळे लठ्ठपणाची समस्या होते. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं आणि तुमच्या शरीरातील चरबीही वाढते. (Breakfast)
किडनीवरही होऊ शकतात गंभीर परिणाम
जास्त मीठ खाल्ल्यामुळे सोडियम शरीरात जातं. त्यामुळे मूत्रपिंडाला सोडियम पचविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागते. याचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो.
चेहरा आणि पायावर सूज येऊ शकते
तज्ज्ञांच्या मते जास्त मीठ खाल्लामुळे पायावर आणि चेहऱ्यावर सूज येते.
वारंवार लघवीला जाणे
जास्त मीठ खाल्ल्यामुळे अनेकांना वारंवार लघवीची समस्या जाणवते. UTI, टाइप 2 मधुमेह आणि अतिक्रियाशील मूत्राशय यासारख्या अनेक आजार हे जास्त मीठ खाल्ल्यामुळे होतात. (Health News)
सतत तहान लागणे
जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला बहुतेक वेळा तहान (Water) लागते. कारण सोडियम हे तुमच्या शरीराचं संतुलन बिघडवतं. त्यामुळे तुम्हाला सतत पाणी प्यावसं वाटतं. (Dehydration)
मग दिवसभरात किती मीठ खावे?
मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं दिवसभरात किती मीठ खायला हवं. तर WHO च्या मते, आपण आपण दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा (Heart Attack, Heart Disease) धोका वाढतो. 'डब्ल्यूएचओ' कडून (World Health Organization) एक रिसर्च करण्यात आला ज्यानुसार लोक दररोज 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. तेव्हा मीठ नियंत्रणात खावे.