Som Yag Yadnya 2023 : प्रवर्ग्य हवनाने भाविक भारावले

देवस्थान परिसरात २५ ते ३० फूट उंच उसळल्‍या अग्‍निज्‍वाळा
Som Yag Yadnya 2023 goa Flames rising 25 to 30 feet high in temple devotee
Som Yag Yadnya 2023 goa Flames rising 25 to 30 feet high in temple devoteeesakal

म्हापसा : काणका-म्‍हापसा येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात सुरू असलेल्या दुर्मीळ अशा अग्निष्टोम महासोमयाग स्थळी सोमवारी ‘प्रवर्ग्य विधी’ अनुभवण्‍यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अबालवृद्ध यज्ञस्थळी दर्शन करण्यासाठी येत असून, अध्यात्मासोबतच यज्ञ ही संकल्पना समजून घेणाऱ्यांची संख्याही दुसऱ्या दिवशी लक्षणीय होती. यावेळी प्रवर्ग्य हवनावेळी २५ ते ३० फूट उंच उसळलेल्‍या अग्निज्वाळा पाहून भाविक भारावले. दहा फेब्रुवारीपर्यंत हा महासोमयाग चालणार आहे.

महासोमयागच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. ६) धार्मिक विधी व हवन झाले. सकाळी ८ ते दुपारी प्रवर्ग्य हवनाच्या विधीस सुरवात झाली. मंत्रोच्चाराच्या माध्यमातून प्रज्वलित होणारा अग्नी व त्याची ३० फूट उंच उसळणारी ज्वाळा पाहण्यासाठी सभामंडपात भक्तांनी एकच गर्दी केली होती. भाविकांसाठी ही एक पर्वणीच होती. त्‍यानंतर दुपारी महाप्रसाद झाला. सायंकाळी ५ ते रात्री आठपर्यंत हाच प्रवर्ग्य विधी संपन्‍न झाला.

चित्ताकर्षित करणारा प्रवर्ग्यविधी...

  • सोमवारपासून प्रवर्ग्य विधीस प्रारंभ झाला. सध्या ३५ पुरोहित यज्ञस्थळी असून, त्‍यात १७ मुख्य व १७ उपमुख्य गुरुजींचा सहभाग आहे. त्यांच्या उपस्थितीत सोमयाग सुरू असून सोमवारी सकाळी सोमवल्ली (वनस्पतीचा राजा) खरेदी विधी पार पाडली.

  • सजवलेल्या बैलगाडीवरून मंडपस्थळीच सवाद्य शोभायात्रा काढून आतिथ्यईष्टी करण्यात आली. नंतर प्रवर्ग्य यज्ञ करण्यात आला. ज्यामध्ये ३० फुटी अग्निज्वाळा तीनवेळा निघाल्या.

  • प्रवर्ग्य विधी हा चित्ताकर्षित करणारा तसेच ऋतुचक्र शुद्ध करणारा व वातावरणात विलक्षण बदल करणार ठरतो. या विधीत मातीच्या छोट्या पात्रात (महावीर) तूप उत्कलन बिंदूपर्यंत तापवले जाते. यावेळी प्रवर्ग्य यज्ञ संबंधित मंत्रोच्चार पठण सुरू असते. गाईचे व शेळीचे दूध काढून ते महावीर पात्रातील तुपावर ओतले गेले. यावेळी अग्निज्वाळा २५ ते ३० फुटापर्यंत उंच उसळल्या.

भक्‍तांची संख्‍या मोठी

महासोमगायाच्या ठिकाणी हवनकुंड अर्थात यज्ञवेदीला परिक्रमा करण्यासाठी हवनकुंडांना प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. सकारात्मक ऊर्जा निर्मिती, वातावरण शुद्धी, मनःशांती आणि आध्यात्मिक समाधानासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या वतीने हा अग्निष्टोम महासोमयागाचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com