
Strong Mind : तुम्ही मनाने खरच खंबीर आहात? तुमच्या या सवयीच देतात उत्तर
These Habbits Tells You Are Mentally Strong Or Not : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण सतत पळत असतो. सतत स्पर्धा आणि स्वतःला सिद्ध करण्याची चढाओढ लागलेली असते. अशात स्वतःकडे बघायला वेळ नसतो पण भरपूर ताण, चिंता यातच प्रत्येक जण वावरत असतो. अशा परिस्थितीत मनाला खंबीर, स्ट्राँग ठेवणं तसं कठीण काम असंत. पण तरीही प्रयत्नाने ते नक्कीच शक्य होतं.
बऱ्याच लोकांना आपण खंबीर मनाचे आहोत असं वाटत असतं. पण खरंच तसं आहे का हे तुमच्या काही सवयी सांगतात. जाणून घ्या.
इमोशनली, लॉजिकली बॅलंस
जर तुम्ही कोणताही विचार करताना भावनिक न होता लॉजिक वापरतात. तर तुम्ही मानसिक खंबीर आहात असं मानता येईल.
प्रॉडक्टीव्ह राहणे
सतत सबबी देणे, दुसऱ्यांबद्दल कुरबूरी करणे, अडचणीच्या वेळी पळ काढणे या प्रकारांपासून तुम्ही दूर असाल तर तुम्ही मेंटली फिट आहात.
बदल स्वीकारणे
कोणत्याही प्रकारचा बदल न घाबरता स्वीकारत असाल आणि त्याचा सामना करत असाल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या फीट आहात
भीतीचा सामना करणे
मानसिकदृष्ट्या कमकूवत लोक भीतीचा सामना करू शकत नाहीत. पण जर तुम्ही तो करत असाल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या फीट आहात.
चुकांमधून शिकणे
चुका झाल्यास रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकणे फार आवश्यक असते. जर तुम्ही त्यातून शिकत असाल तर तुम्ही मानसिकरित्या खंबीर आहात.
इतरांच्या आनंदात आनंद
जर तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानू शकत असाल, त्यांच्याशी स्पर्धा करण्याऐवजी त्यांच्या आनंदात सहभागी होत असाल तर तुम्ही मनाने खंबीर असल्याचं स्पष्ट होतं.
कौशल्य वाढवणे
आपल्या यशाची, अचिव्हमेंट्सची शोबाजी न करता आपली कौशल्ये आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. हे तुम्ही करता का?
प्रश्नांवर उत्तर शोधणे
प्रश्न काय आहे हे समजल्यावर काही लोक फक्त त्यावर चर्चा करत बसतात. त्यासाठी इतरांना किंवा परिस्थितीला दोष देत बसतात. पण जे लोक प्रश्न समजून त्यावर उत्तर शोधतात ते मनाने खंबीर असतात.
निर्णय क्षमता
कोणताही निर्णय घेण्यास जास्त वेळ लावत नाहीत. घेतलेले बहुतांश निर्णय योग्यच असतात, असे लोक मानसिकरित्या खंबीर समजावे.