
Kidney Health Tips : उन्हाळ्यात किडनीचे आरोग्य आवर्जून जपाच, फॉलो करा या घरघुती टीप्स
Kidney Health Tips : अनेकांना किडनीस्टोनचे त्रास हल्ली दिसून येताय. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली याचा प्रभावसुद्धा आपल्या आरोग्यावर होत असतो. तेव्हा बदलत्या जीवनशैलीसह आपल्यालाही आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. किडनीबाबत समस्यांच्या अनेक तक्रारी हल्ली नोंदवण्यात आल्या आहेत. तेव्हा उन्हाळ्यात किडनीचे आरोग्य जपण्यासाठी या गोष्टी लक्षात घ्या.
बदलती जीवनशैली, खाण्यापिण्यात बदल, अल्कोहोलचे (Alchohol) व्यसन आणि व्यायामाकडे दुर्लक्ष यामुळे किडनीबाबतच्या समस्या वाढत चालल्यात. तेव्हा येत्या उन्हाळ्यात जाणून घेऊया की तुम्ही तुमच्या किडनीचं आरोग्य कसं जपू शकता.
आपल्याला किडनीचा त्रास होऊ नये म्हणून आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातून पाण्याचीही यामध्ये महत्त्वाची भुमिका आहे. तुम्ही कोणत्या तऱ्हेचे पाणी पिता? तुमच्या शरीरात किती लीटर पाणी जाते आहे? त्यातून गरम पाणी प्यावे की थंड? याची योग्य काळजी घेणेही आवश्यक आहे. योग्य झोप (Sleep), वेळेवर खाणं-पिणं, भरपूर पाणी पिणं, जंक फूड (Aviod Junk Food) आणि अल्कोहोल टाळणं याकडे तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु वातावरण बदलानुसार आपल्यालाही आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या किडनीचं आरोग्य असे जपा.
वेळेत जेवण करा आणि व्यायाम करा
तुम्हाला वेळेवर आहार घेणे आवश्यक आहे. त्यातून नियमित व्यायाम (Excercise) करणेही गरजेचे आहे. तुम्ही या दोन गोष्टी व्यवस्थित पाळल्यात तर त्याचा चांगला फायदा तुमच्या शरीरावर होईल. तुमचे किडनीचे आरोग्यही चांगले राहील.
गरम पाणी प्यावे की थंड पाणी?
आपल्याला दिवसभर 10 ते 12 ग्लास पाणी पिणं गरजेचे आहे. त्यातून 3 लीटर पाणी जाणंही आपल्या शरीरात आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, किडनीासाठी गरम पाणी (Hot Water For Kidney) प्यावे.
मद्यपान आणि धुम्रपानची सवय सोडा
सध्याची जीवनशैली ही कल्पनेपेक्षाही बदलते आहे. त्यातून निम्म्याहून अधिक लोकांमध्ये मद्यपान आणि धूम्रपानाची सवय आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर नियंत्रण आणणे आपल्याच हातात आहे. तेव्हा किडनीच्या आरोग्यासाठी आपल्या आहारातून दारूचे आणि सिगारेटचे व्यसन कमी करणं आवश्यक आहे.