Swasthaym 2023 : धनुरासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthaym 2023 yoga child health Dhanurasana modern yoga as exercise

लहान मुलांसाठीचे अजून एक लाभदायी आसन म्‍हणजे धनुरासन

Swasthaym 2023 : धनुरासन

लहान मुलांसाठीचे अजून एक लाभदायी आसन म्‍हणजे धनुरासन. धनुरासन सर्व वयोगटासाठीच लाभदायी आहे. परंतु वय वाढते, कामाचे स्‍वरूप बदलते तसे शारीरिक व्याधीपण सुरू होतात त्‍यामुळे प्रत्‍येकानेच हे आसन करणे योग्य नाही. मुलांनी मात्र रोज करायला हरकत नाही.

असे करावे आसन

  • हे पोटावर झोपून करण्याचे म्‍हणजेच विपरीत शयनस्‍थितीमधील आसन आहे. या आसनाची अंतिम स्‍थिती धनुष्यासारखी दिसते. त्‍यामुळेच याचे नाव धनुरासन.

  • प्रथम पोटावर झोपावे. नंतर दोन्‍ही पाय गुडघ्यात वाकवून हाताने पायाचा घोटा पकडावा.

  • हळूहळू शरीराचा पुढचा, कपाळापासून पोटाच्या वरच्या भागापर्यंत व मांडीचा भाग जमिनीपासून वरच्या दिशेला उचलावा.

  • पोटाचा कमीत कमी भाग जमिनीवर टेकलेला असावा व त्‍यावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळावा.

  • मान समोर किंवा वरच्या दिशेला असावी.

  • नजर स्‍थिर व श्वसन संथ असावे. दोन्‍ही हाताचे कोपरे ताठ असावेत.

  • शक्य तेवढाच वेळ आसन टिकवावे.

  • खूप ताणून, थरथरत आसन टिकवू नये. सावकाश आसन सोडून मकरासनात विश्रांती घ्यावी.

  • नियमित सरावाने छान जमू वाटते. शारीरिक व्याधी किंवा काही त्रास असतील तर योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

आसनाचे फायदे

  • पोटावर दाब आल्‍याने पचन व उत्‍सर्जन संस्‍थेचे कार्य सुधारते, पचनाच्या तक्रारी कमी होतात.

  • अपचन, आम्‍लपित्त, गॅसेस, पोटफुगी, तसेच वाताचा त्रास कमी होतो.

  • पोटावरील अतिरिक्‍त चरबी कमी होते. वजन कमी होण्यास उपयुक्‍त. पोटातील इंद्रियांची कार्यक्षमता वाढते.

  • पाठीवर, कंबरेवर दाब आल्‍याने मणका लवचिक, सशक्‍त व सुदृढ होतो. पाठदुखी, कंबरदुखी इ. त्रास कमी होतात.

  • मांडीच्या स्‍नायूंनाही ताण बसल्‍याने अधिक कार्यक्षम व टोनअप होतात.

  • या आसनाच्या सरावाने फुफुसांची कार्यक्षमता वाढते. श्वसनाचे त्रास कमी होतात. दमा, थायरॉईड, मधुमेह, बालदमा इ. त्रासांवर लाभदायी.

  • एकूणच आळस कमी होऊन उत्‍साह, आत्‍मविश्वास वाढतो. व्यक्‍तिमत्त्‍व विकासासाठी उपयुक्‍त.

  • गुडघेदुखी, लिगामेंट इन्जुरी, अपेंडिक्‍स, मासिक पाळीमध्ये, हार्निया पोटाचे शल्‍यकर्म केलेल्यांनी हे आसन करू नये.

टॅग्स :yogachild health