Swasthyam 2022 : मनाला शांती अन् शरीराला ऊर्जा

सर्वेश शशी यांची ‘योगा , फिटनेस आणि त्यापलीकडे’ या विषयावर प्रात्यक्षिक
Sarvesh Shashi
Sarvesh Shashisakal

पुणे : विविध प्रकारची योगासने, त्याला संगीताची जोड, मंत्रोच्चार, निवांत होण्यासाठी हलकेफुलके योगासन आणि त्यातून मनाला लाभलेली शांती अन् शरीराला मिळालेली ऊर्जा अनेक पुणेकरांनी शनिवारी अनुभवली. योग केवळ शारीरिक स्वास्थ्यापुरता मर्यादित नसून त्याचा आपल्या एकूण शरीरावर कसा सकारात्मक परिमाण होतो, हे नागरिकांनी समजून घेत योगाचा अनोखा फायदा जाणून घेतला.

सकाळ माध्यम समूह आणि ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत ‘स्वास्थ्यम्’ या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात फिटनेस ट्रेनर सर्वेश शशी यांनी ‘योग, फिटनेस आणि त्यापलीकडे’ या विषयावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांचे विचार मांडले. सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मेरियट हॉटेलमध्ये त्यांचे सत्र पार पडले. ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार यांनी सर्वेश यांचा सन्मान केला. सर्वेश हे एक तरुण फिटनेस ट्रेनर आहेत. ते ‘सर्व’ योगाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये योगाची भूमिका कशी असते, हे ते शिकवतात.

उपस्थित सर्वांना ‘तुम्ही सर्व जागरूक नागरिक आहात का? असा प्रश्‍न विचारत सर्वेश यांनी विविध टप्प्यांच्या माध्यमातून पुढे जात कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या मनाला योगाच्या माध्यमातून शांती आणि शरीराला ऊर्जा देत योगाचे महत्त्व व फायदे विविध आसनांद्वारे पटवून देत सत्राचा समारोप केला. सुमारे दोन तास चालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील व वयोगटांतील पुणेकर सहभागी झाले होते. शारीरिक आणि मानसिक फिटनेस नेमका काय असतो, योगसाधनेच्या माध्यमातून तो कसा साधला जाऊ शकतो हे त्यांनी या वेळी सांगितले.

सर्वेश शशी यांनी दिलेल्या टिप्स

  • रोज थोडा वेळ तरी योग कराच

  • एकाच दिवशी स्वतःला १०० टक्के देता येणार नाही

  • कोणता त्रास आहे याचा विचार करून योगा करा

  • सर्वच योगासने सर्वांना करता येतील असे नाही

  • कालपेक्षा आज चांगले करू हा विश्‍वास ठेवा

  • स्वतःची काळजी घ्या, नाहीतर तुम्ही कोणाची काळजी घेऊ शकणार नाही

  • आज स्वतःवर प्रेम करा, उद्या त्या प्रेमात आणखी भर घाला

‘एमबीसी’ पाळण्याचा सल्ला

  • ‘एम’ म्हणजे मूव्ह ः रोज किमान पाच मिनिटे पळा

  • ‘बी’ म्हणजे ब्रीथ ः रोज किमान पाच मिनिटे प्राणायाम करा

  • ‘सी’ म्हणजे कनेक्ट ः रोज किमान पाच मिनिटे स्वतःशी कनेक्ट व्हा

सर्वेश शशी यांचे सेशन खूप आवडले. अतिशय सुंदर आणि मनाला शांती देणारे सत्र होते. आपण आपल्या आरोग्याबाबत आणखी जागृत व्हायला हवे, हे या ठिकाणी येऊन जाणवले. सामाजिक जागृतीसाठी असे कार्यक्रम आवश्‍यक आहेत. येथे आत्मसात केलेल्या बाबी रोज करण्याचा प्रयत्न असेल.

- भावना दोषी, गृहिणी

‘स्वास्थ्यम्’ मध्ये सहभागी होणे माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे. नागरिकांमध्ये सातत्याने आरोग्याविषयी जागृती होण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. त्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. रोज आपण स्वतःला १०० टक्के कोणतीच बाब देऊ शकत नाही. मात्र वर्षभर रोज किमान एक टक्का जरी देऊ शकलो तरी पुरे आहे. त्यातून नक्की फरक पडले. सर्वच बाबींत समतोल असायला हवा. सोशल मीडिया त्याला अपवाद नाही. गरजेच्या आहे त्या बाबी ठराविक वेळेपुरत्याच करा व वापरा.

- सर्वेश शशी, फिटनेस ट्रेनर

योगाच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी झालो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आवर्जून वेळ काढावा, असे येथे सहभागी झाल्यानंतर वाटले. आता मी दररोज अर्धा तास आरोग्यासाठी देणार आहे. या कार्यक्रमात मी पत्नी, काका आणि काकी सहभागी झालो होतो. यापुढील काळातदेखील ‘सकाळ’च्या अशा कार्यक्रमात आम्ही सहभागी होणार आहोत.

- धनजित खांडेकर, व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com