Healthy Diet : आरोग्यपूर्ण आहारासाठी टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tips for healthy dietvegetables protein child health doctor

आपल्या ९ ते १६ वयोगटातील पाल्यांना आरोग्यपूर्ण खाण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यांची वाढ आणि विकासासाठी आवश्‍यक

Healthy Diet : आरोग्यपूर्ण आहारासाठी टिप्स

आपल्या ९ ते १६ वयोगटातील पाल्यांना आरोग्यपूर्ण खाण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यांची वाढ आणि विकासासाठी आवश्‍यक आहे. यातून त्यांच्यात चांगल्या सवयी रुजून त्या त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी ठरू शकतात. या वयोगटातील आपल्या पाल्यांमध्ये आरोग्यपूर्ण खाण्याच्या सवयी लावण्यासाठीच्या काही टिप्स.

वैविध्यपूर्ण पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहन ः तुमच्या पाल्यांना विविध प्रकारची फळे, भाज्या, धान्ये आणि प्रोटिन्स खाण्याची सवय लावा व त्यातून त्यांना आहारातून विविध प्रकारची पोषणमूल्ये मिळतील हे सुनिश्‍चित करा. त्यांना नवीन प्रकारच्या अन्नपदार्थांची ओळख करून द्या व ते सतत खायला लावा. यातून त्यांना ते अन्नपदार्थ खाण्याची सवय जडेल.

अन्नावर भरपूर पोषणमूल्ये ठेवा ; प्रक्रिया केलेल्या अन्नापासून मुलांना दूर ठेवा आणि संपूर्ण आणि भरपूर पोषणमूल्ये असलेले अन्नपदार्थ खायला द्या. यामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कमी प्रतीचे प्रोटिन्स आणि आरोग्यपूर्ण फॅटचा समावेश असावा.

मुलांना पदार्थ बनवण्याचे नियोजन आणि प्रत्यक्ष पदार्थ करताना सहभागी करून घ्या. ः आपल्या पाल्यांना अन्नपदार्थ बनवण्याचे नियोजन आणि प्रत्यक्ष पदार्थ बनवताना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. यातून ते त्यांच्यासाठी सकस अन्नपदार्थ कोणते, हे जाणून घेऊ शकतील. त्याचबरोबर पदार्थ निवडण्याची जबाबदारी देऊन आरोग्यदायी पदार्थ खाण्याची सवय लावा.

जेवण आनंददायी बनवा ः सर्व कुटुंबाने एकत्र जेवण घेतल्यास आणि हा वेळ आनंददायी बनवल्यास मुलांमध्ये आरोग्यदायी खाण्याच्या सवयी विकसित होतील. जेवणाच्या टेबलवर तणावरहित व सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

भरपूर पाणी प्या ः तुमच्या पाल्याला अधिकाधिक पाणी पिण्यास प्रोत्साहित करा आणि साखरेचे अधिक प्रमाण असलेल्या सोडा आणि शीतपेयांसारख्या पदार्थांपासून दूर ठेवा.

या टिप्स अमलात आणण्यास प्रोत्साहन देऊन आणि स्वतः रोल मॉडेल बनून तुम्ही तुमच्या पाल्यामध्ये आरोग्यपूर्ण खाण्याच्या सवयी निर्माण होण्यासाठी मदत करू शकता. या सवयी त्यांना भावी आयुष्यात अत्यंत उपयोगी ठरू शकतील.