Corona Update : सहा महिन्यानंतर कोविड रुग्णसंख्या ७० च्या आत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update mumbai
सहा महिन्यानंतर कोविड रुग्णसंख्या ७० च्या आत

Corona Update : सहा महिन्यानंतर कोविड रुग्णसंख्या ७० च्या आत

मुंबई : मुंबईत मे महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि पाहता पाहता दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांच्या घरात पोहोचली; मात्र आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले. त्यानुसार आज दिवसभरात ६६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने सहा महिन्यांनंतर बाधित रुग्णसंख्या ७० पेक्षा कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
मुंबईत सोमवारी कोविडच्या ६६ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या ११ लाख ४९ हजार ११५ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७२५ वर स्थिरावली आहे.

दरम्यान, दिवसभरात १२८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख २८ हजार ३८१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या एक हजार नऊ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण बरे होण्याचा दर - ९८.२ टक्के
कोविड वाढीचा दर - ०.०१४ टक्के
रुग्णदुपटीचा कालावधी - ५,२२५

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08867 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..