धक्कादायक: २०५० पर्यंत १४ दशलक्ष भारतीयांना स्मृतिभ्रंश आजाराचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक: २०५० पर्यंत १४ दशलक्ष भारतीयांना स्मृतिभ्रंश आजाराचा विळखा
२०५० पर्यंत १४ दशलक्ष भारतीयांना स्मृतिभ्रंश आजाराचा विळखा

धक्कादायक: २०५० पर्यंत १४ दशलक्ष भारतीयांना स्मृतिभ्रंश आजाराचा विळखा

मुंबई : अल्झायमर रोग स्मृतिभ्रंशाचा सर्वात सामान्य घटक आहे. ‘डिमेंशिया इन इंडिया’ आणि ‘एलएएसआय व्हेव-वन’ अहवालानुसार २०२० मध्ये सुमारे ५.३ दशलक्ष भारतीय स्मृतिभ्रंश आजाराने प्रभावित झाले होते. २०५० पर्यंत अशा रुग्णांची संख्या तब्बल १४ दशलक्षापर्यंत जाण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

जागतिक अल्झायमर दिनानिमित्त ‘अन्वया’तर्फे ‘नो अल्झायमर नो डिमेंशिया’ संकल्पनेवर आधारित ‘फायरसाईड चॅट’ मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या वेळी इन साईड माईंड केअरचे संचालक डॉ. संजय आर. कुमावत यांनी अल्झायमर आजार आणि उपायांबाबत माहिती दिली. डिमेंशिया असलेल्या वृद्धांसाठी निदान आणि त्यानंतरची काळजी व प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सहाय्यक इको-सिस्टीमवर व कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर या चर्चेत प्रकाश टाकण्यात आला.

व्यवस्थापकीय संचालक प्रशांत रेड्डी यांनी सांगितले, अल्झायमर आजार आणि स्मृतिभ्रंशाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतिभ्रंश झालेल्यांच्या निदानानंतरच्या काळजीदरम्यान येणाऱ्या गंभीर आव्हानांना ओळखण्याचा हेतू चर्चासत्रामागे होता. आम्ही ‘एआय सक्षम अॅट होम अन्वयाची डिमेंशिया केअर’ प्रणालीही विकसित केली आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षित ‘केअर स्पेशालिस्ट’ची टीम आहे. अल्झायमर पूर्ववत होऊ शकत नाही; पण तो मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी नक्कीच उपाय आहेत. गेल्या काही महिन्यांत स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा सकारात्मकरीत्या सुधारण्यात यशस्वी झालो आहोत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98101 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..