हेल्थ वेल्थ : प्री-डायबेटिस : धोक्याचा इशारा!

मधुमेह इतका सामान्य आहे, की तो फक्त ऐकून, आपण आपला मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या अनेक जणांचा विचार करू शकतो ज्यांना या स्थितीचे निदान झाले आहे.
Health Wealth
Health WealthSakal
Summary

मधुमेह इतका सामान्य आहे, की तो फक्त ऐकून, आपण आपला मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या अनेक जणांचा विचार करू शकतो ज्यांना या स्थितीचे निदान झाले आहे.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

मधुमेह इतका सामान्य आहे, की तो फक्त ऐकून, आपण आपला मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या अनेक जणांचा विचार करू शकतो ज्यांना या स्थितीचे निदान झाले आहे. रक्तातील अतिरिक्त साखर हा गोष्टीचा मुख्य खलनायक आहे. त्यामुळे प्री-डायबेटिस हा एक टप्पा आहे, जिथे मुख्य खलनायक साखरेने नुकतेच नुकसान करायला सुरुवात केली आहे. या टप्प्यावर तुम्ही पुरेसे सजग राहिल्यास त्याच्याशी लढा देऊ शकता आणि स्वतःला मधुमेहापासून वाचवू शकता. चला प्री-डायबेटिसबद्दल अधिक समजून घेऊ.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्री-डायबेटिस हा मधुमेह नाही. प्री-डायबेटिस म्हणजे रक्तातील साखर (ग्लुकोज) पातळी सामान्य साखरेपेक्षा जास्त असते, परंतु ‘टाइप २’ मधुमेह म्हणून निदान करण्याइतपत जास्त नसते. जीवनशैलीत लक्षणीय बदल न केल्यास, प्री-डायबेटिसमुळे ‘टाइप २’ मधुमेह होऊ शकतो. प्री-डायबेटिस हा मधुमेह नसला तरी, तो हृदय, रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांवर नकारात्मक परिणाम करतो. मात्र, प्री-डायबेटिसचे निदान होणे ही जीवनशैलीत योग्य बदल करण्याची आणि मधुमेहापासून दूर राहण्याची संधी आहे.

प्री-डायबेटिस कशामुळे होतो?

हे आपल्याला दुसऱ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. आपल्या शरीरात साखर कशामुळे वाढते? कार्बोहायड्रेट्स किंवा साखरेचे अधिक सेवन करणे हे कारण आहे. आपल्या अन्नातून मिळणारे ग्लुकोज स्नायूंच्या हालचाली, हृदयाचे ठोके, विचार करण्याची क्षमता इत्यादींसाठी ऊर्जेचा स्रोत आहे. शरीरातील ग्लुकोजचा पुरवठा शरीराला आवश्यक ऊर्जेपेक्षा जास्त असल्यास तुमच्या रक्तात अतिरिक्त ग्लुकोजची पातळी शिल्लक राहते, जे चांगले नाही. रक्तातील ग्लुकोज विविध पेशींमधील हार्मोन ऊर्जेसाठी वापरतात. इन्शुलिनतुमच्या शरीरात ग्लुकोजच्या उच्च पातळीचे आणखी एक कारण आहे. तुमचे शरीर पुरेसे इन्शुलिन तयार करत नाही, तेव्हा रक्तप्रवाहात सोडलेले ग्लुकोज वापरले जात नाही आणि ते जमा होत राहते, परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते.

‘टाईप १’ मधुमेह अशी परिस्थिती आहे, जिथे शरीर फारच कमी किंवा कोणतेही इन्शुलिन तयार करत नाही, तर ‘टाइप २’मध्ये शरीर इन्शुलिन तयार करते, मात्र, रक्तप्रवाहातून ग्लुकोज बाहेर काढण्यात ते कमी प्रभावी होते. प्रीडायबेटिस ही ‘टाइप २’ मधुमेहाची प्राथमिक अवस्था आहे. शरीरात इन्शुलिनची रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याची क्षमता कमी होण्याची चिन्हे दिसू लागतात, परंतु रक्तातील ग्लुकोजची पातळी स्पष्टपणे जास्त नसते. या अवस्थेत जवळजवळ फारच कमी किंवा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि नियमित तपासणी दरम्यान अनेकदा याकडे दुर्लक्ष होते.

प्रीडायबेटिस असलेल्या व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे न दिसणे शक्य आहे. त्यामुळे प्री-डायबिटीज ‘टाइप २’ मधुमेहापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्याने निदान होत नाही. म्हणूनच अशी शिफारस केली जाते, की ज्यांना प्रीडायबेटिसचा उच्च धोका आहे त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासावी.

प्री-डायबेटिसचे व्यवस्थापन

खाण्याकडे लक्ष द्या : तुम्ही प्री-डायबेटिककडून डायबेटिसकडे जात नाही, याची खात्री करण्यासाठी उचलण्याचे हे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे. ताजी फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असलेल्या पदार्थांचा अधिक समावेश करा आणि तुमच्या आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा किंवा टाळा. फळे आणि भाज्यांमधील फायबर हळू हळू ग्लुकोज सोडेल, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत अचानक होणारी वाढ टळेल.

अधिक हालचाल करा : चालण्याचा किंवा धावण्याचा विचार करा. आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेची शारीरिक क्रिया करण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून पाच दिवस किमान ३० मिनिटे व्यायाम करा. तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही जाड असल्यास तुम्हाला निरोगी वजन मिळवणे आणि राखणे आवश्यक आहे. तुम्ही काय खाता ह्याकडे लक्ष द्या, नियमित व्यायाम केल्याने तुम्हाला असे करण्यास मदत होईल.

डोळ्यांची तपासणी करा : प्री-डायबेटिस आणि ‘टाइप २’ मधुमेहामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या किंवा दृष्टी कमी होण्याचा धोका वाढू शकतो. प्रीडायबेटिसचे निदान झाल्यास, नेत्ररोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या, विशेषत: तुम्हाला अंधूक दृष्टी किंवा तुमच्या दृष्टीत बदल जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

धूम्रपान सोडा : जे लोक सिगारेट ओढतात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता धूम्रपान न करणाऱ्या लोकांपेक्षा ३० ते ४० टक्के जास्त असते. तुम्हाला प्री-डायबेटिसचे निदान झाले असल्यास धूम्रपान केल्याने तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आणखी वाढू शकते.

तणाव तुमचा शत्रू : दीर्घकालीन तणावामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि हार्मोनल बदल होतात. यातून इन्शुलिनचे कार्य बदलू शकते व ‘टाइप २’ मधुमेहाचा धोका संभवतो. ध्यान, व्यायाम, वाचन आणि बागकाम यांसारखे छंद जीवनशैलीचा भाग बनवा. मदतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

इतर विकारांचे व्यवस्थापन करा : तुम्ही आधीच उच्च कोलेस्टेरॉल पातळी किंवा उच्चरक्तदाब यांसारख्या परिस्थितींचा सामना करत असाल, तर तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे, की तुम्ही अशा परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी संभाव्य काळजी घेत आहात. झोपेच्या विकारांबाबतही हे लागू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com