हेल्थ वेल्थ : उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी.. vikas sinh writes health wealth summer hydrated drinking water | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drinking Water

हेल्थ वेल्थ : उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी..

- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

भारतातील शहरी भागातून आला असल्यास वर्षभर उन्हाळा पाहिला असेल. उन्हाळ्यात उष्णता नेहमीपेक्षा जास्त जाते, जी असह्य होते. तुमचा बराचसा वेळ घराबाहेर, ट्रेन किंवा बसमागे धावण्यात, दरवाजा उघडणे आणि बंद करणे, पायऱ्या चढणे किंवा खरेदीनंतर किराणा सामान उचलण्यात घालवत असल्यास तुम्ही उष्ण वातावरणात स्पर्धा करणारे रोजचे खेळाडू आहात.

एखाद्या अॅथलीटप्रमाणेच तुम्हाला थकवा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डिहायड्रेशनचा सामना करावा लागण्याची जास्त शक्यता आहे. तुम्ही रीहायड्रेट कसे व्हाल आणि अॅथलीटप्रमाणे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कशी भरून काढाल?

उन्हाळ्यात फिरताना पुरेसे हायड्रेटेड असणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे पाणी शरीराला थंड होण्यास आणि आराम देण्यास मदत करते. घाम येणे हे मुळात शरीराचे तापमान थंड करण्यासाठी आणि सुरक्षित मर्यादेत परत आणण्यासाठी शरीराची संरक्षण यंत्रणा आहे.

आर्द्रता इथे अडथळा आणते. आर्द्रता हे मुळात हवेतील पाण्याचे प्रमाण असते. आर्द्रता जास्त असते, तेव्हा हवा आणखी पाणी घेऊ शकत नाही, किंवा इथे सांगायचे झाले तर घाम घेऊ शकत नाही. म्हणूनच घाम देखील तसाच राहतो आणि तुम्हाला गरम वाटत राहते. अशाप्रकारे घाम तुमच्या शरीराचे तापमान राखण्याचे काम करतो.

एका व्यक्तीला दररोज सरासरी २-३ लिटर पाणी लागते. तुम्ही दिवसभर काय करत आहात त्यानुसार ते विभागले जाऊ शकते.

उन्हात बाहेर पडण्यापूर्वी

तुम्ही घराबाहेर पडण्यापूर्वी साधारण अर्धा लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे द्रव आवश्यक असते. कारण घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. प्रवासात चालण्यामुळे शरीराचे तापमान अधिक वाढते, याचा अर्थ तुम्हाला जास्त घाम येतो. त्यासाठी पाण्याची जास्त गरज भासते.

उन्हात प्रवास करताना

तुम्ही प्रवासाला गेलेले असताना, तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दर १५-२० मिनिटांनी १५०-२०० मिली पाणी पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. तुम्ही थेट उन्हात गेला नसला, तरीही तुमच्या सभोवतालचे वातावरण आणि हवामान तुमच्या संसाधनांचा निचरा करण्यासाठी पुरेसे असेल. गजबजलेल्या भागातून प्रवास करणे हे तुमच्या शरीराचे तापमान वाढण्याचे आणखी एक कारण आहे, ज्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला थोडेसे अधिक पाणी प्यावे लागेल.

मिनरल्सचे महत्त्व

तुम्हाला घाम येतो तेव्हा तुम्ही फक्त पाणी गमावत नाही. घामामध्ये काही इलेक्ट्रोलाइट्स किंवा शरीरातील मिनरल्स असतात. त्यामुळे तुमची इलेक्ट्रोलाइट पातळी कायम ठेवण्यासाठी तुमच्या पाण्यात चिमूटभर सोडियम टाकणे फायद्याचे ठरेल.

उन्हाळ्यात लिंबू पाणी, नारळाचे पाणी, खरबुजाचा रस आणि ताजी फळे जसे की आंबा आणि खरबूज यांचे सेवन करावे. इलेक्ट्रोलाइट पातळी वाढवण्यासाठी ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स (ओआरएस) घेतले पाहिजे. एकाच वेळी खूप जास्त घोट घेऊ नका. पाण्याच्या मोठ्या घोटामुळे पोटात जडपणा आणि अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते.

तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यावर शरीरातील पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट पातळीची हानी भरून काढणे महत्त्वाचे आहे. तुम्ही प्रवास करताना १ लिटर पाणी वापरत असल्यास, तुमचे १.५-२ लिटर उरलेले पाणी दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात प्या.

रिहायड्रेटेड राहण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे आपण किती पाणी वापरले आहे हे दर्शविणारी बाटली खरेदी करणे. त्यावर मार्किंग करणे. तुमचे रोजचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आणखी किती पाणी वापरावे लागेल याची माहिती यावरून तुम्हाला मिळेल. तुम्ही बस किंवा ट्रेनमध्ये चढता तेव्हा पाण्याचा एक घोट घ्या. किंवा तुम्ही कामावर एखादे पान टाइप करून पूर्ण कराल, तेव्हा तुम्ही आणखी एक सिप घेऊ शकता.

पाण्याची बाटली जवळ ठेवणे हा तुम्ही पाणी पित आहात याची खात्री करण्याचा आणखी एक मार्ग आहे. तहान लागल्यावर उठून पाणी आणावे लागत असेल, तर अशावेळी तहान शमवण्यापेक्षा बसून राहणे पसंत कराल. त्यामुळे पाण्याची बाटली हाताजवळ ठेवा. तुम्ही काही अॅप्स डाऊनलोड करू शकता, त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी पाणी पिण्याची आठवण करून देतात. दिवसाच्या शेवटी हे सर्व आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आणि निर्णायक आहे हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यावर येते. एकदा की तुम्हाला ते कळले की, तुम्ही नियमित अंतराने आपोआप पाणी पिण्यास सुरुवात कराल. ते तुम्हाला उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी नेहमी तयार ठेवेल.