
आपल्यापैकी बहुतेकांना वजन कमी करायचे आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण खातो त्यापेक्षा जास्त ऊर्जा खर्च करतो तेव्हा आपले वजन कमी होते.
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी...!
- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप
आपल्यापैकी बहुतेकांना वजन कमी करायचे आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण खातो त्यापेक्षा जास्त ऊर्जा खर्च करतो तेव्हा आपले वजन कमी होते. याला उष्मांकाची कमतरता असेही म्हणतात.
वजन कमी करण्यासाठी अनेक पेय आणि अन्न लोकप्रिय आहेत. कॉफी हे जगभरातील अनेकांचे आवडते पेय आहे आणि ते आपल्याला ऊर्जा वाढवणे आणि थकवा दूर करण्यास मदत करण्यासाठी ओळखले जाते.
कॉफी अनेक आरोग्य फायद्यांसाठी देखील ओळखली जाते आणि वजन कमी करण्यात मदत करण्यास ती लोकप्रिय आहे. चला जाणून घेऊया ब्लॅक कॉफीचे काही फायदे आणि ते वजन कमी करण्यात कशी मदत करते.
कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात. हा लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. याचा अर्थ असा, की यामुळे लघवीच्या स्वरूपात अधिक द्रवपदार्थ शरीरातून कमी होतात.
यामुळे तात्पुरते वजन कमी होऊ शकते, त्याच बरोबर ही भूक कमी करण्यास मदत करते. परिणामी तुम्ही थोडे कमी खाता आणि वजन कमी होते.
कॉफी चयापचय सुधारण्यासदेखील मदत करू शकते, सतर्कता सुधारते. कॉफीमधील कॅफिन शरीराची रचना बदलण्यास मदत करते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
सिंगापूरमध्ये केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की २४ आठवडे दररोज ४ कप कॅफिनयुक्त, कॉफीचे नियमित सेवन केल्याने चरबीचे प्रमाण सरासरी ३.७ टक्क्याने कमी होते.
या अभ्यासानुसार, शरीराचे वजन ८० किलो असेल तर, २४ आठवड्यांनंतर दररोज ४ कप कॉफी घेतल्याने शरीराचे वजन सुमारे ३ किलो कमी होऊ शकते. त्याने जास्त वजन कमी होत नाही, तुम्ही व्यायाम करून आणि योग्य आहार घेऊन यापेक्षा जास्त वजन कमी करू शकता, परंतु, कॉफी पिणे नक्कीच मदत करू शकते.
दररोज किती कॉफी पिणे योग्य आहे?
प्रौढांसाठी दररोज कॅफीनचा सुरक्षित वापर ४०० मिली ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी असावा. याचा अर्थ असा की आपण दिवसातून ४ कपापेक्षा जास्त कॉफी घेऊ नये.
तथापि, तुम्ही रक्तदाबाच्या समस्येचा सामना करत असाल तर सावधगिरी बाळगणे आणि कॉफीचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे. तसेच कॉफीच्या जास्त सेवनामुळे काही लोकांना चिंता, निद्रानाश आणि अस्वस्थ वाटू शकते.
तुम्ही कॅफीनच्या सेवनाबाबत संवेदनशील असाल तर उपयुक्त पर्याय म्हणून डिकॅफिनेटेड कॉफी मिळू शकते. येथे महत्त्वाचा संदेश असा आहे की ब्लॅक कॉफी, एकतर कॅफिनेटेड किंवा डिकॅफिनेटेड, ही सर्वोत्तम निवड असू शकते.
कारण कॉफीमध्ये अतिरिक्त मलई, दूध, साखर किंवा फ्लेवर्ड सिरप घातल्याने ब्लॅक कॉफीचे होणारे फायदे नष्ट करतात.