
हेल्थ वेल्थ : दैनंदिन चालणे नियमित होण्यासाठी...
- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप
धावणे आणि जॉगिंग हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी चालावे लागते. स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास घेणे, किराणा सामान घेण्यासाठी कोपऱ्यावरील दुकानात जाणे किंवा उन्हाळ्यात पंखा सुरू करण्यासाठी चालावेच लागते. आरोग्यासाठी चालणे उपयुक्त आहे.
चालण्याचे फायदे
चालण्यासाठी सर्वांत प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे वजन कमी करणे. तुम्ही कसे, किती वेळा आणि महत्त्वाचे म्हणजे आठवड्यातून किती वेळा चालता यावरही ते अवलंबून असते. तुम्ही एका तासासाठी वेगाने चाललात, तर तुम्ही त्यात सुमारे ३६० कॅलरीज बर्न करू शकता. हे सुमारे ५ उकडलेली अंडी खाल्ल्याने मिळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण बर्न करण्यासारखे आहे. नियमित चालण्याबरोबरच आहारावर नियंत्रित ठेवल्यास थोडे वजन कमी करू शकाल. तुम्ही चालता तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा तुमच्या मेंदूकडे जातो, ज्यामुळे तुमचा मूड हलका होतो आणि त्याचा तुमच्या मनावरही सकारात्मक परिणाम होतो.
मित्र बनवा
दररोज चालत राहण्याचा एक मार्ग म्हणजे चालणारा मित्र शोधणे. तुमच्या सारखीच आवड असलेली व्यक्ती शोधा ज्याला दिवसातून एकदा फिरायचे आहे आणि दररोज चालण्यासाठी विशिष्ट वेळ ठरवा. असे केल्याने कधीतरी तुम्हाला स्वतःला चालायला जावेसे वाटले नाही तरी तुम्ही त्यात सातत्य ठेवाल.
प्रगतीचा मागोवा
एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देणारी एक गोष्ट म्हणजे आव्हानाचा विचार आणि आपले स्वतःचे रेकॉर्ड तोडणे. त्याच वेळी, आपण वास्तविक वेळेत किती प्रगती केली आहे हे पाहिल्यावर आपल्याला त्याचा अभिमान आणि आपण हे करू शकलो याचा आनंद देखील असतो. अॅप डाऊनलोड करणे आणि फिटनेस ट्रॅकिंग घड्याळात गुंतवणूक करणे हा स्वतःला बाहेर काढण्यासाठी प्रेरित करण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो.
चालण्याची वेळ निश्चित करा
असे केल्याने तुम्हाला ठराविक वेळी ठराविक वेळा साठी फिरायला जावेच लागेल. तुमच्याकडे चालण्यासाठी ठरलेली वेळ असल्यास अन्य सगळ्या गोष्टी बाजूला सारून तुम्ही ते कराल. चालणे तुमच्या दिनक्रमाचा भाग आहे. खरेदी करा आरामात चालण्यासाठी, तुमच्याकडे योग्य पोशाख असणे आवश्यक आहे. काही कपडे आणि शूज खरेदी करणे हा चालण्याचा अनुभव उत्तम करण्याचा निश्चित मार्ग आहे. तुम्ही पोशाख खरेदी करूनही चालण्याच्या संपूर्ण कृतीमध्ये गुंतवणूक केल्यास चालण्याची अधिक संधी असते.
पॉडकास्ट शोधा
तुम्ही पॉडकास्ट मालिका शोधू शकता जे भाग ३०-४० मिनिटांच्या कालावधीचे आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही चालायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही नवीन भाग ऐकू शकता आणि पॉडकास्ट संपल्यानंतर तुम्ही चालणे थांबवू शकता. अशा सवयी तुम्हाला चालण्याचा कालावधी मोजण्यापासून तुमचे मन विचलित करण्यास मदत होईल.
संयम महत्त्वाचा आहे
अखेरीस सगळे, संयमाच्या पैलूवर येते. आपण रिझल्ट ओरिएंटेड आहोत. आपण फक्त दोन आठवड्यांच्या चालण्यापासून परिणामांची अपेक्षा देखील करतो. इथेच आपल्या संयमाची परीक्षा येते. आपल्याला फक्त सातत्य राखायचे आहे आणि दररोज चालत राहायचे आहे आणि लवकरच, तुम्हाला तुमच्या शरीरात तो बदल दिसायला सुरुवात होईल.