Weight Loss Journey : चक्क 115किलो वजनाच्या महिलेने डाएट न करता केलं 50 किलो कमी l Weight Loss Journey Of A Homemaker Mom Kuljeet Kaur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss Journey

Weight Loss Journey : चक्क 115 किलो वजनाच्या महिलेने डाएट न करता केलं 50 किलो कमी

Weight Loss Journey Of A Homemaker Mom : लग्नानंतर, बाळ झाल्यानंतर वजन वाढणे हा आपल्याकडचा एक फारच सामान्य प्रकार आहे. याशिवाय सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत बैठे काम, ताण यामुळे वजन वाढण्याची समस्या बहुतेकांना सतावत असते. अनेक जण यासाठी जीम लावताता, डाएट करतात पण परिणाम दिसतोच असं नाही.

मात्र आता आम्ही अशा एका महिलेची स्टोरी सांगणार आहोत जी तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य घरातली आहे. तिने १०-१२ नाही तर चक्क ५० किलो वजन कमी केलं आहे तेही डाएट न करता.

Weight Loss Journey

Weight Loss Journey

कुलजीत कौर ही अशी एक महिला आहे, जिने डायटिंग न करता तब्बल ५० किलो वजन कमी केलं आहे. फक्त एक गोष्ट मात्र तिने आवर्जून केली अन् तिला यशही मिळालं. कुलजीतचा मुलगा ८ वर्षांचा आहे. तिने डायटींग केलं नाही की जीम पण जॉइन केलं नाही.

मुलाच्या जन्मानंतर कुलजीतचं वजन वाढतच गेलं. तर दुसरीकडे तिला PCOS झाला. जर तिने आपलं वजन कमी नाही केलं तर आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होणार होत्या. त्यानंतर तिला एका ऑटोइम्यून कंडीशनची माहिती झाली जी तिच्या शरीराच्या डिफेंस सिस्टीमला दिवसेंदिवस अशक्त बनवत होती.

Weight Loss Journey

Weight Loss Journey

कुलजीत हळू हळू डिप्रेशनच्या पहिल्या पायरीवर पोहचली होती. तिचं वजन एवढं वाढलं होतं की, ती विमानाचा सीटबेल्टमध्येही बसत नव्हती.

काय होतं डाएट?

कुलजीतने वजन कमी करण्यासाठी फक्त आपल्या डाएटकडे लक्ष दिलं. ज्यात सगळं खाऊनही प्रमाण कमी केलं. आणि फिजिकली जास्त अॅक्टिव्ह झाली.

ती किती खाते याकडे तिथे सर्वाधिक लक्ष दिलं. आणि याच पद्धतीने वजन कमी केलं.

सकाळी उठताच ती एक ग्लास गरम पाणी पित. ज्यामुळे शरीरातले सर्व टॉक्सिन्स बाहेर पडतात.

वजन कमी करताना लोक ज्या गोष्टी खाणे सोडतात, त्या सर्व गोष्टी ती खात होती.

फिजिकल अॅक्टीव्हीटी

कुलजीतने सर्वात पहिले आपली फिजिकल अॅक्टीव्हिटीची सुरुवात चालणे आणि धावणे याने केली.

याशिवाय तिने काही बॉडी वेट वर्कआऊट्सही केले. याचा हळू हळू रिझल्ट दिसायला लागला.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.