Weight Loss Tips : ना सर्जरी ना औषधी, 294 किलो वजनाच्या या पठ्ठ्याने असं घटवलं वजन l weight loss man nicholas craft journey loosed 165 kg weight without any medicine and surgery | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss Tips

Weight Loss Tips : ना सर्जरी ना औषधी, 294 किलो वजनाच्या या पठ्ठ्याने असं घटवलं वजन

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाहीत. सर्जरी, ट्रिटमेंट आणि वेळ आली तर उपाशी राहूनसुद्धा बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. कारण वाढत्या वजनामुळे हाय बीपी, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, फॅटी लिव्हर यांसारख्या समस्या उद्भवतात.

अलीकडे सोशल मीडियावर एका मुलाचा फोटो व्हायरल होतोय. ज्याने त्याचं भलं मोठं वजन कमी केलं. त्यानंतर लोकांना तो ओळखणं कठीण झालं. अमेरिकेच्या मिसिसिपी मध्ये राहाणाऱ्या 42 वर्षाच्या निकोलस क्राफ्टचे वजन जून २०१९ मध्ये २९४ किलो होते. मात्र १६५ किलो वजन कमी केल्यानंतर त्याचं वजन १३० किलो झालं. त्याचा फोटो बघून त्याचं हे चकीत करणारं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला दिसून येईल.

निकोलस लहानपणापासूनच लठ्ठ होता

5.9 इंच उंच निकोलस मुलाखतीदरम्यान म्हणाला की, मी लहानपणापासून लठ्ठपणाचा सामना करत आलो आहे. मी फिजीकली जास्त सक्रिय नसल्याने माझं एवढं वजन वाढलंय. माझं वजन नंतर एवढं झालं की माझं चालणं फिरणं कठीण झालं होतं. माझ्या गुडघ्यांमध्ये त्रास, शरीरदुखी आणि श्वास घेण्यासही त्रास होत होता.

निकोलसने पुढे सांगितले की, २०१९ मध्ये डॉक्टरांनी सांगितले की मी जर माझ्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तीन चार वर्षात माझा मृत्यू होईल. तेव्हापासून त्याने त्याच्या वजनाचं गांभीर्य लक्षात घेतलं. त्याच्या वजन कमी करण्यच्या प्रयत्नात त्याचं आजीचं मोठं योगदान आहे. त्याची आजी त्याला वजन कमी करण्यासाठी त्याला प्रेरणा द्यायची मात्र तिचे २०१९ मध्येच निधन झाले. मात्र तेव्हापासून त्याने वजन कमी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले.

कसे वजन कमी केले

निकोलस पुढे म्हणतो की वजन कमी करण्यासाठी त्याने कुठलीही स्ट्रिक्ट डायटिंग फॉलो केली नाही. मी फक्त माझ्या खाण्याच्या पद्धतीकडे लक्ष ठेवत होतो आणि रोजच्या कॅलरीज मोजत होतो. याशिवाय सोडा, तेलकट पदार्थ, ब्रेड, पास्ता, भात आणि कार्ब्स त्याच्या खाण्यातून वगळले होते. त्याऐवजी त्याने फळं,भाज्या आणि प्रोटीन फूड्स त्याच्या आहारात अॅड केले होते. तसेच पायी चालण्यावर त्याने भर दिला होता. डंबलने तो वर्कआउट करायचा.

वजन कमी केल्यापासून त्याच्या शारीरिक समस्या कमी झाल्या आहेत. तसेच त्याला श्वास घ्यायलासुद्धा आता त्रास जात नाही. त्याला आधीपेक्षा जास्त एनर्जेटिक वाटतं. (Health)

कुठलीच औषधं किंवा सर्जरी त्याने केली नाही

निकोलसने वजन कमी करण्यासाठी कुठलेच औषध घेतले नव्हते किंवा कुठलीही सर्जरी केली नव्हती.तसेच वजन कमी करण्यासाठी कुठलाही शॉर्टकट अप्लाय करू नका असेही तो म्हणाला. कायम नॅचरल पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यात रिझल्ट मिळण्यास थोडा वेळ लागतो मात्र दीर्घकाळाचा फायदा देखील होतो.