
Health Care : जेवताना कधी पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम? वाचा शेफ रणवीरचा सल्ला
Health Care : आरोग्य जपण्यासाठी रोजच्या आयुष्यात अगदी लहान लहान गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. जेवतेवेळी पाणी कोणत्या वेळेत प्यावे याबाबात तुम्हाला कल्पना आहे काय? अलीकडेच शेफ रणवीर ब्रार लोकप्रिय टीव्ही शो कॉमेडी नाईट विथ कपिलमध्ये पोहोचला होता, जिथे त्याने पाणी कधी प्यावे याबद्दल सांगितले.
शेफ रणवीरच्या पाककृतींनी जगाला वेड लावले आहे. याशिवाय, तो लोकप्रिय टेलिव्हिजन फूड शोचा होस्ट आणि मास्टरशेफ इंडियाच्या तीन सीझनमध्ये जज म्हणून ओळखला जातो. अलीकडेच रणवीर ब्रार लोकप्रिय टीव्ही शो कॉमेडी नाईट विथ कपिलमध्ये पोहोचला होता, जिथे त्याने पाणी कधी प्यावे याबद्दल सांगितले.
जेवत असताना पाणी कधी प्यावे?
जेवताना पाणी नेमके कधी प्यावे याबाबत बरेच लोक कन्फ्यूज असतात. कोणी म्हणतात जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे, तर कोणी म्हणातात कधी पण पाणी प्या. तेव्हा कपिल शर्माने याच प्रश्नाचे उत्तर कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये रणवीरला विचारले असता त्याने सांगितले की,आयुर्वेदानुसार जेवण्यापूर्वी पाणी पिणे हे अमृत आहे आणि जेवताना मधेच पाणी पिणे म्हणजे आनंद आहे आणि जेवल्यानंतर लगेच पिणे हे विषासारखे आहे.
जेवल्यानंतर एक तासानंतर पाणी आपल्याला शक्ती देते. म्हणूनच तुम्ही आधी किंवा नंतर प्या, ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
रणवीर ब्रार त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या चाहत्यांसह एकापेक्षा एक चवदार आणि आरोग्यदायी पदार्थ शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. शेफ रणवीर ब्रारचा जन्म लखनऊमधील शीख कुटुंबात झाला होता. ब्रार यांना लहान वयात लखनौमधील स्थानिक कबाब विक्रेत्यांकडून प्रेरणा मिळाली, ज्यामुळे त्यांना अन्नाबद्दलची आवड जोपासण्याची प्रेरणा मिळाली. एचएएल स्कूल लखनऊ येथून त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे.