
Hair Wash in Periods : पिरेड्सनंतर केस कधी धुवावे?
Hair Wash in Periods : पिरेड्स हा प्रत्येक मुलीच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. दर महिन्याला मुलींना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज, प्रथा-कुप्रथा आहेत. आधुनिक काळानुसार काही प्रथा-कुप्रथा नष्ट झाल्या असल्या तरी काही गैरसमज आजही आहे.
अनेक मुलींना पिरेड्सनंतर केस कधी धुवावे, हे आजही माहिती नाही. याबाबतही अनेक गैरसमज पाहायला मिळतात. आज आपण त्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (when should wash hair after periods )
ज्योतिषशास्त्र काय सांगते
ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमचे पिरेड्स तीन दिवस चालत असेल तर तुम्ही चौथ्या दिवशी केस धुवावे. जर तुमचे पिरेड्स सात दिवस चालत असेल तर तुम्ही आठव्या दिवशी केस धुवावे.
केस कधी धुवावे?
साधारणत: पिरेड्स संपल्यानंतर तुम्ही पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी केव्हाही केस धुवू शकता. जरी तुमचे पिरेड्स दोन तीन दिवस असतील तरीसुद्धा तुम्ही पाचव्या दिवशी केस धुवावे.
केस धुताना हा ज्योतिष उपाय करावा
गुरुवारी केस धुणे शुभ मानले जाते. याशिवाय केस धुताना तुम्ही एक ज्योतिष उपाय ट्राय करू शकता यामुळे तुम्ही दुष्परिणाम किंवा प्रभावापासून वाचू शकता. अंघोळ करताना पाण्यात सेंधा मीठ टाकावं आणि त्यानंतर त्या पाण्याने केस धुवावे.
पिरेड्स संपल्यानंतर केस का धुवावे?
पिरेड्स संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केस धुवावे. पिरेड्स संपल्यानंतर केस धुतल्याने तुम्हाला स्वच्छ आणि नीटनीटके वाटतात.
पिरेड्समध्ये केस का धुवू नये?
पिरेड्सदरम्यान केस न धुण्याचा सल्ला यासाठी दिला जातो कारण या दरम्यान शरीराचं तापमान अधिक असतं आणि याच दरम्यान जर तुम्ही केस धुतले तर शरीराच्या तापमानात कंट्रोल राहत नाही.
विज्ञान काय सांगतं?
विज्ञानाच्यामते तुम्ही कोणत्याही दिवशी केस धुवू शकता. पिरेड्स दरम्याने केस धुवून अंघोळ करणे एक मिथ आहे. ज्योतिषशास्त्रात जरी ठराविक दिवस सांगितले असले तरी विज्ञानाच्या मते तुम्ही कोणत्याही दिवशी केस धुवू शकता.