थंड पदार्थ खाल्ल्यावर तुम्हालाही डोकेदुखी जाणवते का ? मग हे नक्की वाचा....

खूप गरम आणि खूप थंड पदार्थ खाऊ नयेत.
brain freeze
brain freezegoogle

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी थंड खाण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. पण थंड आइस्क्रीम किंवा अन्य काही खाल्ल्यास मेंदूला झिणझिण्या (brain freeze) येतात. पण यात गंभीर असे काहीच नसते. आराम न करता किंवा कोणतेही औषध न घेता बरे वाटते. बरे होण्यासाठी सर्वांत चांगला उपाय म्हणजे गळा आणि तोंडाचे तापमान सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करा.

brain freeze
Video - ताणतणाव घालवा...मेंदूचे आजार पळवा... - डॉ. संदीप देशपांडे

लक्षणे काय ?

थंड खाल्ल्यानंतर डोक्यात प्रचंड वेदना सुरू होतात. किती प्रमाणात थंड पदार्थ खाल्ला आहे यावर या वेदनांचा कालावधी अवलंबून असतो. इतर प्रकारच्या डोकेदुखीच्या तुलनेत ब्रेन फ्रीजची सुरुवात लवकर होते. सोबत मायग्रेन असेल तर त्या व्यक्तीला पोटदुखी आणि मळमळीचा त्रासही होऊ शकतो. मोठा आवाज किंवा प्रखर प्रकाशामध्ये ही डोकेदुखी अधिक जाणवते.

कारणे काय ?

जेव्हा तुम्ही एखाद्या थंड पदार्थाचा घोट किंवा घास तोंडात घेता तेव्हा तुमच्या ताळूचा भाग सामान्य तापमानापेक्षा अधिक थंड होतो. तोंड पुन्हा गरम करण्यासाठी मस्तिष्कामधून रक्त पाठवले जाते. जास्त रक्त पाठवण्यासाठी भोवतालच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि पुन्हा वेगाने उघडतात. त्यामुळे वेदना होतात.

brain freeze
मेंदू तल्लख ठेवायचायं? मग करा हे सोपी व्यायाम

उपाय

गरम पाणी प्या.

थंड पदार्थ खाणे-पिणे बंद करावे.

खूप गरम आणि खूप थंड पदार्थ खाऊ नयेत.

ताळूला अंगठ्याने किंवा जीभेने स्पर्श करावा.

थंड पदार्थ थोडा-थोडा खा किंवा प्या.

खाण्याआधी जेवण गरम करा.

थंड हवा तोंडात जाऊ नये यासाठी तोंड कापडाने किंवा मास्कने बांधून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com