कोरोनाचा XE व्हेरिएंट धोकादायक? जाणून घ्या तज्ञाचे मत

चीन, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.
 XE variant
XE variant सकाळ डिजिटल टीम

भारतात जरी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी चीन, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचे उप-प्रकार BA.1 आणि BA.2 पासून बनलेला XE व्हेरिएंट (XE Verient) आता धोक्याचा इशारा देत आहे. हा नवीन प्रकार 10 पट अधिक वेगाने संसर्ग करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. आता मुंबईत देखील याचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे देशात चिंतेत भर पडली आहे. (XE variant is 10 times more transmissible than Omicron)

 XE variant
बापरे! रक्तानंतर आता मानवी फुफ्फुसात देखील आढळलं मायक्रोप्लास्टिक

नवीन प्रकार असलेल्या XE व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की या रुग्णामध्ये XE व्हेरिएंट नसावा, या बद्दल आम्ही खात्रीपुर्वक सांगू शकत नाही.

सर्वात संसर्गजन्य प्रकार आहे का?

कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचे उप-प्रकार BA.1 आणि BA.2 पासून बनलेला XE व्हेरिएंट (XE Verient) हा अति धोक्याचा असल्याचा इशारा तज्ञांनी दिलाय. या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य असल्याने पुन्हा कोरोनाची लाट येण्याचा धोका जास्त आहे

 XE variant
सावधान! दिवसा डुलक्या येणे असू शकते अल्झायमरचे लक्षण

तज्ञ काय म्हणतात?

वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग म्हणाल्या की, कोरोना व्हायरसचा नवीन XE व्हेरिएंट चिंतेची बाब नाही कारण ते ओमिक्रॉनच्या इतर उप-प्रकारांपेक्षा जास्त तीव्रता आणण्याची शक्यता कमी आहे.आम्हाला व्हेरिएंट (XE) बद्दल जे माहीत आहे ते म्हणजे हा चिंतेचा मुद्दा नसल्याचे कांग म्हणाल्या

 XE variant
स्मोकिंगमुळे हार्ट अ‍ॅटकचा धोका होतो कमी; संशोधकांचा दावा

काही आरोग्य तज्ञांनुसार XE हा शेवटचा व्हेरिएंट नाही,असे न्यूयॉर्क पोस्टने अहवाल दिला आहे. यूएससह बर्‍याच देशांमध्ये सबवेरिएंटचा अहवाल दिला गेला नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तिथे हा व्हेरिएंट नसावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com