
Yami Gautam : यामी सारखी हॉट फिगर हवीये? जाणून घ्या तिचा Fitness Funda
Yami Gautam Fitness Funda : सुंदर, ह़ॉट आणि एकदम फीट अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख असणारी यामी गौतम ही अभिनेत्री आहे. तिला आपण काही जाहिराती आणि अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. तिच्या सौंदर्याचं खरं रहस्य कोणत्या फेअरनेस क्रीमपेक्षा तिच्या फिटनेस फंड्यात आहे. ती स्वतःच्या फीटनेस विषया फार काँशियस असून त्यासाठी फार मेहनत घेते.
तुम्हीही यामीसारखी स्लीम फीट फीगर मिळवू शकतात. यामीने नुकत्याच एका इंटरव्ह्युवमध्ये तिच्या फिटनेस रुटीन विषयी सांगितलं आहे. शिवाय ती सतत आपल्या सोशल मीडिया हँडलवरून वर्कआउट व्हिडीओज टाकत असते. तिने मुलाखतीत सांगितलं आहे की, महिलांनी रोज वेट लिफ्टिंग करायला हवं. याशिवाय अजून बऱ्याच टिप्स यामीने दिल्या आहेत, जाणून घेऊया
यामी सांगते ती आठवड्यातून ४ दिवस वेट ट्रेनिंग करते.
याशिवाय ती नियमित योगापण करते.
वर्कआउट बरोबर हेल्दी जेवणंही तेवढंच आवश्यक असतं असं यामी आवर्जून सांगते.
यासाठी ती मसालेदार आणि तळलेल्या पदार्थांपासून शक्यतो लांब राहते.
हेल्दी खाणं, वर्क आउट याबरोबरच हेल्दी राहण्यासाठी शरीराला योग्य आरामाचीही आवश्यकता असते.
याविषयी यामी सांगते की, ज्यावेळी ती वर्क आउट नाही करत त्या दिवशी ती पूर्ण आराम करते.
वेटलॉस करण्यासाठी सायकलिंग उत्तम पर्याय असल्याचं तिनं सांगितलं आहे.
शिवाय स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी, नट्स आणि फळं ती नियमित खाते.